Happy Birthday Mohammad Kaif:  नेटवेस्ट फायनल्सचा हिरो, भारतातील दमदार फिल्डर्सपैकी एक असलेल्या मोहम्मद कैफ याचे काही धमाल किस्से, खास त्याच्या वाढदिवसानिमित्त

एकेकाळी टीम इंडियाचा (Indian Team) सर्वोत्कृष्ट फील्डर असलेला मोहम्मद कैफ (Mohammad Kaif) आज (1 डिसेंबर) आपला 39 वा वाढदिवस साजरा करीत आहे. आपल्या काळातील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकांपैकी एक असलेला कैफ आयपीएलमध्येही खेळताना दिसला. कैफ यांचा जन्म 1 डिसेंबर 1980 रोजी उत्तर प्रदेशमधील अलाहाबादमध्ये झाला. एकदा टीम इंडियाचा स्टार खेळाडूची ओळख मिळालेल्या कैफने 2018 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. 2006 मध्ये टीम इंडियासाठी अखेरचा सामना खेळलेल्या कैफने 12 वर्षासाठी भारतीय संघातून बाहेर राहिल्यावर निवृत्ती जाहीर केली. क्रिकेटच्या मक्का म्हटल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर कैफने 2002 च्या इंग्लंडविरुद्ध नेटवेस्ट ट्रॉफीच्या (NatWest Trophy) अंतिम सामन्यात नाबाद 87 धावा काढून यजमान देशावर भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. कैफची ही खेळी आजही कोणताही क्रिकेट चाहता विसरू शकलेला नाही.

2003 च्या विश्वचषकात कैफने क्षेत्ररक्षण आणि भारताच्या फलंदाजीमध्ये उत्कृष्ट भूमिका निभावली. या विश्वचषकात भारतीय संघ उपविजेतेपदावर संतोष मानावे लागले. आज कैफच्या 39 व्या वाढदिवशी आपण जाणून घेऊया कैफच्या बाबतीत काही धमाल किस्से:

1. लॉर्ड्सच्या मैदानावर खेळलेला डाव स्वत: कैफचाही सर्वात संस्मरणीय डाव आहे. 13 जुलै 2002 ला भारत नेटवेस्ट ट्रॉफीचा अंतिम सामना खेळत होता आणि यजमान इंग्लंडने त्याला 326 धावांचे आव्हान दिले होते. या विजयाचा नायक कैफला त्याच्या कारकीर्दीत पहिल्यांदाच ‘सामनावीर’ म्हणून गौरविण्यात आले. या विजयानंतर भारतीय संघाचा कर्णधार सौरव गांगुली याने आपला शर्ट काढून लॉर्ड्सच्या बाल्कनीमधून लहरावला होता.

2. कैफने अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना २००६ मध्ये खेळला होता. यानंतर कैफची संघात निवड झाली नाही आणि त्याने राजकारणात हात आजमावले. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत कैफने काँग्रेसचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवली, पण सध्याचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्याकडून कैफला पराभवाला सामोरे जावे लागले.

3. क्रिकेट विश्वात असे अनेक खेळाडू आहेत ज्यांची सुरुवात चांगली झाली, पण कारकीर्द जास्त काळ टिकू शकली नाही. कैफचाही त्या खेळाडूंमध्ये समावेश केला जातो. 2000 वर्षी भारताच्या अंडर-19 संघाने कैफच्या नेतृत्वात विश्वचषक जिंकले, तेव्हा वाटले की भारतीय संघाला नवीन कर्णधार मिळाला आहे. पण, कैफची कारकीर्द 125 वनडे आणि 13 टेस्ट मॅचइतकीच टिकली.

4. जॉन्टी रोड्स, तिलकरत्ने दिलशान यांच्यासारख्या प्रसिद्ध फील्डर्सपैकी एक कैफच्या नावावर एक अनोख्या विक्रमाची नोंद आहे. एका विश्वचषक सामन्यात फिल्डरकडून सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम कैफच्या नावावर आहे. 2003 मध्ये जोहान्सबर्ग येथे झालेल्या विश्वचषकात कैफने श्रीलंकाविरुद्ध 4 कॅच पकडले होते.

5. अनुभवी ऑस्ट्रेलियन फिरकी गोलंदाज शेन वॉर्न याने त्याच्या 'नो स्पिन' या आत्मचरित्रात आयपीएलच्या पहिल्या हंगामात कैफबद्दलचा अनुभव उघडकीस केला. वॉर्न म्हणाले की, 'राजस्थान रॉयल टीम म्हणून जेव्हा आम्ही हॉटेलमध्ये पोहोचलो तेव्हा सर्व खेळाडू आपापल्या खोल्यांच्या चाव्या घेऊन तेथून निघून गेले. काही मिनिटांनंतर मी रिसेप्शनमध्ये टीम मालकांशी गप्पा मारत होतो तेव्हा कॅफ तिथे पोहोचला आणि त्याने रिसेप्शनिस्टला 'मी कैफ' आहे. रिसेप्शनिस्ट म्हणाला, 'हो, मी तुम्हाला कशी मदत करू?' कैफने उत्तर दिले की, 'प्रत्येक खेळाडूप्रमाणे मलाही एक छोटी खोली मिळाली आहे'. मी म्हणालो, 'तुम्हाला मोठी खोली किंवा काही हवे आहे का?' त्याने पुन्हा त्याच उत्तर दिले, मी कैफ आहे. मी एक वरिष्ठ खेळाडू आहे, आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे, त्यामुळे मला मोठ्या खोलीची आवश्यकता आहे.' वॉर्नने पुढे लिहिले की, 'मी त्यांना सांगितले होते की प्रत्येकाला एकाच प्रकारची खोली मिळाली आहे. फक्त मला एक मोठी खोली मिळाली आहे कारण मला बर्‍याच लोकांना भेटावं लागत आहे.' यानंतर कैफ तेथून निघून गेला.

2000 मध्ये दक्षिण आफ्रिकाविरुद्ध कसोटी क्रिकेटद्वारे कैफने आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीची सुरुवात केली. 2011 मध्ये कैफने पत्रकार पूजा यादवसोबत लग्न केले. दोघांची भेट एका मित्राच्या माध्यमातून झाली आणि चार वर्षांच्या डेटिंगनंतर कैफ आणि पूजाचे लग्न झाले. क्रिकेटच्या मैदानावर कैफ चांगलाच सक्रिय आहे. एक खेळाडू म्हणून नाही, तर क्रिकेट समीक्षक म्हणून.