चंद्रकांत पंडित

एक काळ असा होता की विदर्भाला घरगुती क्रिकेटमध्ये कोणताही विचार केला जात नव्हता परंतु मागील काही वर्षांत परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. विदर्भ, दोन वर्षांत चार घरगुती विजयानंतर दिग्गजांच्या यादीत आला आहे आणि आता कोणताही संघ त्यांना हलकेपणाने घेत नाही. विदर्भ क्रिकेटला (Vidarbha Cricket) दिग्गजांच्या यादीत नेण्यात सर्वात महत्त्वाची भूमिका म्हणजे त्यांचे प्रशिक्षक चंद्रकांत पंडित (Chandrakant Pandit) यांनी निभावली. पंडित यांना जास्त माध्यमांसमोर येणे पसंत नाही. त्यांनी पडद्यामागे राहून काम केले आहे आणि तसं त्यांना करायचं देखील आहे. भारतीय क्रिकेटमध्ये एकीकडे असे खेळाडू आहे जे त्यांच्या अथक प्रयत्नांनी यशस्वी झाले आहे, तर दुसरीकडे असेही आहेत ज्यांच्याकडे प्रतिभा असूनही त्यांना यश मिळाले नाही. यात चंद्रकांत पंडित यांचा देखील समावेश आहे.

सय्यद किरमानी (Syed Kirmani) आणि त्यानंतर किरण मोरे (Kiran More) यांच्यासारख्या यष्टीरक्षक-फलंदाजांमुळे पंडित यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची फारशी संधी मिळू शकली नाही. आज, पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त आपण जाणून घेऊया त्यांच्या जीवनाबद्दल काही खास गोष्टी:

1. 1986 ते 1992 दरम्यान, पंडित यांनी 5 टेस्ट आणि 36 वनडे सामन्यांमध्ये विकेटकीपिंग केली. कसोटीत त्याने 14 झेल घेतले आणि 2 स्टंपिंग्स केले, तर वनडे सामन्यात त्यांनी 15 कॅच घेतले आणि 15 झेल टिपले. पण, किरमाणी आणि किरण मोरे यांच्या प्रभावी खेळीमुळे पंडित यांनी जास्त संधी मिळू शकली नाही.

2. एक गोष्ट जाणून सर्वांना आश्चर्य होईल की, चंद्रकांत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचे गुरु दिवंगत रमाकांत आचरेकर याने शिष्य होते. पंडित यांनी प्रशिक्षक म्हणून देखील काम केले आणि त्यांच्या क्रिकेट कोचिंगमध्ये ती गोष्ट स्पष्ट दिसून येते.

3. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जास्त यश न मिळाल्याने पंडित यांनी आपले लक्ष घरगुती क्रिकेटकडे वळवले. 58 वर्षीय चंद्रकांत यांनी रणजी ट्रॉफीमध्ये मध्य प्रदेश, मुंबई आणि असम संघाचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी 138 प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 48.57 च्या सरासरीने 22 शतकांच्या जोरावर 8,209 धावा केल्या. शिवाय, खेळाडू म्हणून पंडित 1983-84, 1984-85 विजयी मुंबई रणजी ट्रॉफी संघाचादेखील भाग होते.

4. यानंतर त्यांनी कोच म्हणून काम करणे सुरु केले. प्रशिक्षक म्हणून त्यांनी धमाकेदार सुरुवात केली आणि मुंबईला 2002-03, 2003-04 असे दोनदा चॅम्पियन बनवले. यानंतर, 2011-12 माडे ते राजस्थान संघाशी जुळले. यादरम्यान, राजस्थानला सर्वात कमकुवत संघ म्हणून मानले जात होते. पण, याच काळात राजस्थानचा संघ चॅम्पियन बनला आणि घरगुती मैदानावर नाव-लौकिक आला. नंतर, त्यांनी पुन्हा एकदा मुंबई संघाला प्रशिक्षण दिले आणि 2015-16 मध्ये चॅम्पियन बनण्यास सहाय्य केले.

5. 1987 च्या भारताच्या विश्वचषक संघात त्यांचा समावेश करण्यात आला होता. आणि त्यांनी त्यांच्या घरच्या मैदानावर, मुंबई इथे इंग्लंडविरुद्ध सेमीफायनल मॅचमध्ये दिलीप वेंगसरकर यांना रिप्लेस केले होते. या मॅचमध्ये भारताला 35 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. पंडित यांनी सेमीफायनलमध्ये 24 धावा केल्या होत्या.

पंडित यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला सय्यद किरमाणी यांचा उत्तराधिकारी म्हणून पहिले जात होते. टीम इंडियामध्ये त्यांना यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून स्थानदेखील मिळाले. पण, किरण मोरे यांच्या प्रवेशाने राष्ट्रीय संघात त्यांचा प्रवास लवकर संपुष्टात आला.