Happy Birthday Anil Kumble: अनिल कुंबळे याला गौतम गंभीर ते व्हीव्हीस लक्ष्मण यांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; वीरेंद्र सेहवाग याने मागितली माफी, पहा Tweet
(Photo Credit: IANS)

टीम इंडियाचा जंबो अनिल कुंबळे (Anil Kumble) आज 49 वर्षाचा झाला. टीम इंडियाचा माजी कर्णधार कुंबळेने गोलंदाजीने अनेक विक्रम मोडले. कुंबळेने 2012 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. कुंबळे आज भारतासाठी टेस्ट आणि वनडेमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अव्वल क्रमांकावर आहे. कुंबळेने टेस्टमध्ये 619 तर वनडेमध्ये 337 विकेट्स घेतल्या आहेत. शिवाय, आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंपैकी कुंबळेने मुथय्या मुरलीधरन आणि शेन वॉर्न यांच्यानंतर तिसऱ्या सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. कुंबळेच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद आहे, पण पाकिस्तानविरुद्ध एका डावात घेतलेल्या 10 विकेट आजही कोणी विसरू शकलेलं नाही. शिवाय, आजवर कोणीही एका डावात 10 विकेट घेण्याचा पराक्रम केला नाही. कुंबळेने त्याच्या क्रिकेट करिअर दरम्यान अनेक मॅच विनिंग खेळी केल्या आहेत. (Happy Birthday Anil Kumble: पाकिस्तानविरुद्ध एका डावात घेतले 10 विकेट, जाणून घ्या कसे मिळाले भारताच्या 'Milestone Man' अनिल कुंबळे यांना 'जंबो' हे नाव)

टीम इंडियाच्या या मॅच विनरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत अनेक सहकारी क्रिकेटपटू- वीरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag), हरभजन सिंह (Harbhajan Singh), गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि अन्य खेळाडूंनी ट्विटरद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. यासर्वांमधील सेहवागचे ट्विट लक्षवेढी राहिले. सेहवागने कुंबळेला शुभेच्छा दिल्या आणि त्यांनतर त्याची माफीही मागितली. सेहवागने लिहिले की, "वाढदिवसाच्या शुभेच्छा अनिल कुंबळे. तुम्हाला तुमच्या दुसऱ्या टेस्ट शहतकापासून वंचित ठेवल्याबद्दल क्षमस्व. पण वास्तविक जीवनात तुम्ही शतक ठोकले पाहिजे अशी मी प्रार्थना करतो. अजून 51च पाहिजे... कम ऑन... कम ऑन अनिल भाई! वाढदिवसाच्या शुभेच्छा."

मी अंतर्गत खेळलेला तू सर्वश्रेष्ठ नेता आहेस!- गंभीर

मला खात्री आहे की हा खास दिवस तुम्हाला सतत आनंद आणि अनेक मौल्यवान आठवणी देईल!-लक्ष्मण

भारताच्या महान मॅच विनरला वाढवीसच्या शुभेच्छा-मोहम्मद कैफ

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, माझ्या गोलंदाजीचा जोडीदार आणि गुरु- हरभजन सिंह

गोलंदाजीने अनेक विक्रम करणाऱ्या अनिल कुंबळेच्या नावावर टेस्ट क्रिकेटमध्ये एकच शतक आहे. कुंबळेने इंग्लंडविरुद्ध मॅचमध्ये एकमेव कसोटी शतक झळकावले होते. शिवाय, कुंबळेच्या नावावर 5 अर्धशतकंदेखील जमा आहे. ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्ध 2007/08 मालिकेदरम्यान अ‍ॅडिलेड मॅचमध्ये कुंबळेला त्याचे टेस्टमधील दुसरे अर्धशतक करण्याची संधी होती, पण त्याला 13 धावा कमी पडल्या आणि 87‬ धावांवर बाद झाला.