Happy Birthday Anil Kumble: पाकिस्तानविरुद्ध एका डावात घेतले 10 विकेट, जाणून घ्या कसे मिळाले भारताच्या 'Milestone Man' अनिल कुंबळे यांना 'जंबो' हे नाव

भारताचा माजी क्रिकेटर आणि दिग्गज गोलंदाज अनिल कुंबळे (Anil Kumble) यांचा जन्म 17 ऑक्टोबर 1970 बेंगळुरूमध्ये झाला होता. कुंबळे पहिले भारतीय क्रिकेटपटू आहे ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 619 विकेट घेतल्या आहेत. वनडे पेक्षा कुंबळेचा टेस्ट करिअर अत्यंत यशस्वी राहिला. 1990 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणानंतर लवकरच 'जंबो' गोलंदाजीत देश-विदेशात प्रभावी गोलंदाज म्हणून ओळखला जायला लागला. कसोटी क्रिकेटमध्ये मुथय्या मुरलीधरन आणि शेन वॉर्न यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात यशस्वी गोलंदाज म्हणून ओळखला जाणाऱ्या कुंबळेने आपल्या कारकीर्दीत 600 पेक्षा अधिक विकेट घेतल्या आहेत. त्याच्या टेस्ट करिअरमधील पाकिस्तान (Pakistan) विरुद्धचा एक सामना नेहमीच संस्मरणीय राहणार आहे. (IPL 2020: भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांची किंग्स XI पंजाबच्या संचालकपदी नेमणूक)

7 फेब्रुवारी 1999 मध्ये पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात कुंबळेने एका डावात 10 विकेट घेण्याचा पराक्रम केला होता. मागील अनेक वर्ष क्रिकेटमधील प्रसिद्ध नाव असणाऱ्या कुंबळेचा आज 49 वा वाढदिवस आहे. आजच्या या खास क्षणी जाणून घेऊया कुंबळेच्या आयुष्यातील काही हटके किस्से:

1. कुंबळे जेव्हा आपल्या कारकीर्दीतील यशांचा आनंद घेत होते, तेव्हा ते ट्रॅव्हल एजंट चेतना नावाच्या मुलीच्या प्रेमात पडले. चेतना आधीपासूनच विवाहित होती आणि एका मुलीची आई पण होती. पण चेतनाला तिच्या विवाहित जीवनात संघर्ष करावा लागत होता. जेव्हा अनिलने चेतनला लग्नाचा प्रस्ताव दिला तेव्हा तिने फेटाळून लावत असे म्हटले की दुसर्‍या एखाद्यावर विश्वास ठेवून तिला आता प्रेमात पडायचे नाही. पण, अनिलने चेतनाशी लग्न करण्याबाबत निश्चय केला होता. पण अनिलाने चेतनाशी लग्न करण्याचा विचार केला होता. चेतनाने नकार देऊनही, तो तिला भेटतच राहिला आणि या मुलाखतीत अनिलने चेतनाला आश्वासन दिले की आपण तिला कधीच सोडणार नाही आणि चेतनला लग्न करण्याचे आश्वासन दिले.

2. 7 फेब्रुवारी 1999 मध्ये कुंबळेने पाकिस्तानविरुद्ध टेस्ट सामन्यात एका डावात 10 विकेट घेण्याचा पराक्रम केला होता. फिरोजशाह कोटला स्टेडियममध्ये खेळण्यात आलेल्या मॅचमध्ये कुंबळेने पाकिस्तानी संघाचा धुव्वा उडवला आणि भारतीय क्रिकेटमध्ये एक नवीन कदाचित, कधीही न मोडला जाणारा विश्वविक्रम स्थापित केला.

3. कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानावर 1993 मध्ये खेळण्यात आलेल्या हिरो कपमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध फायनलमध्ये कुंबळेने जे केले ते भारतीय क्रिकेटमधील 20 वर्षांचा विक्रम आहे. आणि तो म्हणजे वनडे क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाजीची नोंद. कुंबळेने पाचव्या क्रमांकापासून शेवटपर्यंत सर्व फलंदाजांना बाद केले. आणि ते हि फक्त 6 धावा देऊन. 1 बाद 57 धावांवरच्या विंडीज संघाने पुढील 9 विकेट 66 धावांवर गमावले.

4. 2007 च्या कसोटी संघाचा कर्णधार असताना कुंबळेची मुख्य वैशिष्ट्ये ऑस्ट्रेलिया (Australia) च्या 2007-08 च्या भारत दौऱ्यादरम्यान लिहिली गेली होती. सिडनीतील दुसर्‍या कसोटीतील वादग्रस्त अम्पायरिंग, वर्णद्वेषाचे आरोप आणि 'मँकेगेट' घोटाळ्यातील त्याच्या भूमिकेसाठी भारत दौरा प्रसिद्ध होता. असे सर्व असतानाही भारतीय संघ कुंबळेच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियामध्ये राहिला. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियाला 2-0 ने मागे होते. पण, पर्थ येथे झालेल्या पुढच्या सामन्यात, पर्थच्या वेस्टर्न ऑस्ट्रेलियन क्रिकेट असोसिएशन मैदानावर (WACA) यजमानाला पराभूत केले. यासह ऑस्ट्रेलियाला या मैदानावर पराभूत करणारा भारत (India) पहिला आशियाई संघ बनला.

5. कुंबळेला सर्वात पहिले माजी क्रिकेटपटू नवजोत सिंह सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांनी 'जम्बो' नाव दिले होते. इराणी करंडक दरम्यान कुंबळे आणि सिद्धू उर्वरित भारताकडून खेळत असताना कुंबळेचे काही चेंडू अचानक त्या सामन्यात बाऊन्स घेत होते. खरं तर कुंबळेच्या गोलंदाजीची ही खासियत होती. यावर सिद्धू म्हणाले होते- 'जम्बो जेट', नंतर त्यांना 'जम्बो' म्हणून संबोधले जाऊ लागले.

6. 2002 मध्ये विंडीजचा फलंदाज मेरी डिलन याच्याकडून बॉल लागल्यानंतर कुंबळेचे जबडे तुटले. आणि नंतर कुंबळेने तुटलेल्या जबड्याने वेस्ट इंडिजविरुद्ध सामना खेळला होता. कुंबळेने वेदनेला त्याच्या वरचढ होऊ दिले नाही चेहऱ्याला पट्टी बांधून सामना खेळला. याचे बक्षीस म्हणून त्याला ब्रायन लारा याची विकेट मिळाली.

अनिल कुंबळे. भारतीय क्रिकेट संघाचा तो खेळाडू ज्याला अजून कोणीही विसरू शकलेला नाही. सध्याच्या घडीला कोणीही क्रिकेटपटू भारताच्या या 'माईलस्टोन मॅन' ने केलेल्या विक्रमाच्या जवळी पोहचू शकला नाही. 1990 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या कुंबळेने 2012 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिसरा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाजी म्हणूननिवृत्ती घेतली.