IPL 2020: भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांची किंग्स XI पंजाबच्या संचालकपदी नेमणूक
Anil Kumble | (Picture Credit: Instagram)

किंग्स 11 पंजाबने (Kings XI Punjab) भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे (Anil Kumble) यांची संघाच्या संचालकपदी नेमणूक केली आहे. पंजाबने आजवर एकदाही IPL जिंकलेलं नाहीये. 2014 साली ते उंबरठ्यापर्यंत पोचले होते. पण कोलकाताने त्यांचं स्वप्न धुळीस मिळवलं होतं.

अनिल कुंबळेंच्या नियुक्तीविषयी बोलताना संघाचे मालक नेस वाडिया म्हणाले, ''कुंबळे यांचं क्रिकेटमधील ज्ञान वादातीत आहे. कठीण प्रसंगातही शांत राहण्याची त्यांची ताकद खूप मोलाची आहे. तसेच आधीसुद्धा IPL मध्ये 2 संघांचा प्रशिक्षक म्ह्णून त्यांनी मध्ये जबाबदारी पार पाडली आहे. आम्हाला आशा आहे की त्यांच्या अनुभवाचा फायदा आमच्या संघाला नक्कीच होईल.'' (हेही वाचा. IND vs SA 2nd Test Day 1: मयंक अग्रवाल याचे सलग दुसरे शतक, केली 'या' विक्रमांची नोंद)

संघाचा माजी कर्णधार जॉर्ज बेली हा बॅटिंग कोच असेल. तसेच, कर्टनी वॉल्श (Courtney Walsh) बॉलिंग कोच असतील, तर, सुनील जोशी हे त्यांना सहाय्य्य करेल. तर फिल्डिंग कोच म्हणून जोंटी र्होडसला (Jonty Rhodes) नेमण्यात आलेलं आहे.

2 वर्षांपूर्वी पंजाब संघाने रविचंद्रन अश्विनला (Ravichandran Ashwin) कर्णधार बनवून त्यांनी नव्याने सुरवात केली होती. पण तरीही पुन्हा 2 वर्ष त्यांच्या पदरी निराशाच पडली. त्यामुळेच या वर्षी अश्विन दिल्लीकडे जाणार असे म्हंटले जात होते. पण हे वृत्त खोटं असल्याचंही टीमचे मालक नेस वाडिया यांनी म्हटले आहे. आता ही सर्व उलथापालथ टीमच्या फायद्याची ठरत्ये का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.