Eoin Morgan आणि Jos Buttler यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता, ‘त्या’ व्हायरल Tweets वर ECB ने दिले चौकशीचे आदेश
जोस बटलर आणि इयन मॉर्गन (Photo Credit: Facebook)

इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (England Cricket Board) अज्ञात खेळाडूच्या आक्षेपार्ह ट्विटची तपासणी सुरू केल्याच्या दुसर्‍याच दिवसानंतर इयन मॉर्गन (Eoin Morgan) आणि जोस बटलर (Jos Buttler) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता दिसत आहे कारण बोर्डाने दोघांच्या मागील एका ट्वीटची चौकशी सुरु केली असल्याचे वृत्त समोर आले आहे. मॉर्गन इंग्लंडचा एकमेव वनडे वर्ल्ड कप विजेता कर्णधार आहे तर बटलर इंग्लंड संघाचा उपकर्णधार आहे. Telegraph.co.uk च्या वृत्तानुसार, मॉर्गन आणि बटलर यांनी 'सर' हा शब्द वापरुन ट्विटरवर भारतीयांची खिल्ली उडवण्याचा आरोप आहे. बटलरच्या ट्वीटवर नजर टाकले तर हे सिद्ध होते की त्याने 'सर' हा शब्द वापरला होता आणि तुटलेली इंग्लिश लिहीत भारतीयांची खिल्ली उडवली होती. मॉर्गनने 18 मे, 2018 रोजी अभिनंदन करताना बटलरसाठी सर’ हा शब्द वापरला होता. सोशल मीडियावर मोठ्या व्हायरल झाल्यानंतर बटलरने ट्विट डिलीट केले. (Ollie Robinson च्या निलंबनानंतर ECB ला दुसर्‍या अज्ञात क्रिकेटपटूच्या सोशल मीडियावर वर्णद्वेषी ट्विटचा फटका, चौकशीला सुरुवात)

कोलकाता नाइट रायडर्स संघाचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम (Brendon McCullum) यांनी मॉर्गनच्या ट्विटवर प्रतिक्रिया व्यक्त केली आणि भारतीयांची थट्टा केली. “@josbuttler सर, तुम्ही सलामीची चांगली फलंदाजी केली,” मॅक्लमने लिहिले. मॉर्गन इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) आयपीएल फ्रेंचायझी कोलकाता नाइट रायडर्सचा (केकेआर) कर्णधार आहे तर बटलर राजस्थान रॉयल्सच्या प्रमुख फलंदाजांपैकी आहे. आयपीएलचा महान दिग्गज मॅक्युलम केकेआरशी संबंधित आहे. अभिनंदन करणारे ट्विट लिहिताना ते रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघासमवेत कार्यरत होते. दरम्यान, Telegraph.co.uk मधील अहवालात म्हटले आहे की या दोघांना फटकारण्याबाबत मंडळ चौकशीनंतर निर्णय घेईल. गेल्या आठवड्यात न्यूझीलंडविरुद्ध सलामीच्या कसोटी सामन्यात पदार्पण करणाऱ्या ऑली रॉबिन्सनच्या निलंबनानंतर या तिघांचे ट्वीट सोशल मीडियात व्हायरल झाले होते.

रॉबिनसनने 2012 आणि 2014 दरम्यानच्या आपल्या वर्णद्वेषी आणि लैंगिकतावादी ट्विटबद्दल दिलगिरी व्यक्त केली होती. त्याने कसोटी सामन्यात पदार्पण केल्यानंतर हे ट्विट व्हायरल झाले होते. रॉबिनसनला आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटकडून निलंबित केले गेले आहे पण त्याला देशांतर्गत क्रिकेटमध्ये ससेक्सकडून खेळण्याची परवानगी आहे. ससेक्सने अद्याप त्यांच्या अंतिम संघाची पुष्टी केली नाही. ईसीबीची टी-20 ब्लास्ट आज, 9 जूनपासून सुरु होणार आहे.