Ollie Robinson च्या निलंबनानंतर ECB ला दुसर्‍या अज्ञात क्रिकेटपटूच्या सोशल मीडियावर वर्णद्वेषी ट्विटचा फटका, चौकशीला सुरुवात
ओली रॉबिनसन (Photo Credit: IANS)

England Cricket Racism: इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्ड (ईसीबी) नवीन ट्विटर वादळामुळे हादरले आहेत. ओली रॉबिन्सनला त्याच्या वर्णद्वेषी ट्विटर पोस्ट्समुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबित केल्यावर एका अज्ञात ब्रिटिश खेळाडूचे आणखी एक जातीय ट्वीट उघडकीस आले आहे. इंग्लंडच्या दुसर्‍या क्रिकेटपटूची ऐतिहासिक “आक्षेपार्ह” सोशल मीडिया पोस्टसाठी चौकशी सुरू असल्याची माहिती क्रिकेट वेबसाइट Wisden.com ने सोमवारी दिली. विस्डेनने सांगितले की जातीयवादी ट्विट उघडकीस आले परंतु त्यांनी त्या खेळाडूची ओळख जाहीर करणे निवडले नाही कारण जेव्हा ते पोस्ट केले गेले तेव्हा तो अंडर-16 होता. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाच्या प्रवक्त्याने सांगितले की, “इंग्लंडच्या एका खेळाडूने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर ऐतिहासिक आक्षेपार्ह पोस्ट केले आहे हे आमच्या लक्षात आले आहे.” (Ollie Robinson Suspended: न्यूझीलंड विरोधात 7 विकेट घेणाऱ्या ब्रिटिश गोलंदाजाला ECB ने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून केले निलंबित, सोशल मीडिया बनले कारण)

“आम्ही याकडे लक्ष देत आहोत आणि थोड्या काळाने याबद्दल आणखी प्रतिक्रिया देणार आहोत.” इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ओली रॉबिनसनला 2012 आणि 2013 मध्ये सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या अपमानास्पद साहित्याच्या चौकशीचा निकाल लागेपर्यंत सर्व आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबित करण्यात आल्यानंतर हे घडले आहे. लॉर्ड्स कसोटीत पदार्पण करणाऱ्या रॉबिनसनला 8-9 वर्षांपूर्वी केलेल्या आक्षेपार्ह ट्विटमुळे फक्त सार्वजनिकरित्या माफी मागावी लागली नाही, तर पहिल्या कसोटीतच उत्कृष्ट कामगिरी करूनही त्याला शिक्षेचा सामना करावा लागला आहे. मागील आठवड्यात न्यूझीलंड विरोधात लॉर्ड्स कसोटी सामन्यात पदार्पण केले तेव्हा आपल्या ट्वीटर पोस्टबद्दल रॉबिनसनने "अनारक्षितपणे" दिलगिरी व्यक्त केली. गुरुवारी एजबॅस्टन येथे सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्ध दुसर्‍या कसोटी सामन्यातूनही त्याला बाहेर करण्यात आले आहे. रॉबिनसनच्या जागी किवी संघाविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी डोम बेसचा संघात समावेश करण्यात आला आहे.

रॉबिनसनने आपल्या ट्विटमध्ये आशियाई वंशाच्या लोकांबद्दल आक्षेपार्ह भाषण केले होते. इतकंच नाही तर एका ट्विटमध्ये त्याने समलैंगिकतेबद्दल अपमानास्पद शब्दही वापरले होते. दरम्यान, या घटनेमुळे ईसीबीवर दबाव वाढण्याची शक्यता आहे. काही अहवालांनुसार इंग्लंडमधील सर्व सध्या खेळाडूंचे ट्विटर फीड आणि इन्स्टाग्राम अकाउंटचे परीक्षण केले जात आहे.