जॉनी बेयरस्टो (Photo Credits: Getty Images)

आयसीसी क्रिकेट विश्व कप 2019 च्या 41 व्या सामन्यामध्ये आज चेस्टर ली स्ट्रीट (Chester-le-Street) च्या द रिवर साइड ग्राउंड (The Riverside Ground) मध्ये इंग्लंड आणि न्युझीलंड यांच्यामध्ये लढत होत आहे. टॉस जिंकून इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत इंग्लंडच्या संघाने निर्धारित ओव्हरमध्ये 8 बळी गमावून, न्यूझीलंड (New Zealand) च्या समोर 306 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. पुढे होणाऱ्या पाकिस्तान-बांग्लादेश सामन्यामध्ये पाकिस्तान हा सामना जिंकण्याचा शक्यता अधिक असल्याने, इंग्लंडसाठी सेमीफायनलमध्ये पोहचण्यासाठी हा सामना जिंकणे फार महत्वाचे आहे.

इंग्लंड संघासाठी आज पुन्हा एकदा सलामी फलंदाज जॉनी बेयरस्टोने 99 बॉल्सचा सामना करत, 15 चौकार आणि 1 षटकार यांच्यासह, 106 धावांची शानदार शतकी खेळी केली. बेयरस्टोच्या व्यतिरिक्त जेसन रॉय ने 60, जोए रूटने 24, विकेटकिपर फलंदाज जोस बटलरने 11, कप्तान इयॉन मोर्गनने 42, बेन स्टोक्स ने 11, क्रिस व्होल्स ने 04, लियम प्लंकट ने नाबाद 15, आदिल रशदने 16 आणि जोफ्रा आर्चर ने नाबाद 1 अशी धावा केल्या. (हेही वाचा: ICC World Cup 2019 मधील भारताचा अंतिम सामना बनणार एम एस धोनी चा टीम इंडिया साठी शेवटचा, जाणून घ्या)

न्यूझीलंडच्या संघासाठी आज वेगवान गोलंदाज टेंट बोल्ट, मॅट हेनरी आणि जिमी नीशम ने क्रमश: 2-2 विकेट घेतल्या.  या गोलंदाजाव्यतीरिक्त स्पिन गोलंदाज मिशेल सैंटनर आणि टिम साउदी ने 1-1 ने यश मिळविले.