IND vs NZ 2nd ODI 2022 Live Streaming Online: भारतासाठी करो किंवा मरो सामना, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहणार लाईव्ह मॅच
IND vs NZ (Photo Credit: Twitter/@Black Caps)

IND vs NZ 2nd ODI 2022: भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना रविवारी हॅमिल्टन येथे होणार आहे. टीम इंडियासाठी हा करो किंवा मरोचा सामना आहे. हा सामना गमावल्याने भारतीय संघ मालिकाही गमावेल. ऑकलंडमध्ये शुक्रवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने भारताचा सात गडी राखून पराभव केला. 306 धावा करूनही टीम इंडियाचा पराभव झाला. उत्कृष्ट फॉर्मात असलेल्या केन विल्यमसन आणि टॉम लॅथम यांनी भारतासमोर अडचणी निर्माण केल्या आणि लक्ष्य सहज गाठले. अशा स्थितीत भारतीय गोलंदाजांना दुसऱ्या वनडेत चांगली कामगिरी करायला आवडेल. (हे देखील वाचा: Rishabh Pant ला मिळत असलेल्या संधींवर मिळू शकतो ब्रेक, माजी दिग्गजाने केलं मोठं विधान)

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा वनडे सामना कधी आणि कुठे खेळवला जाईल

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा वनडे सामना रविवार, 27 नोव्हेंबर रोजी होणार आहे. हा सामना हॅमिल्टन येथील सेडॉन पार्क स्टेडियमवर खेळवला जाईल.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा वनडे कधी सुरू होईल?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना भारतीय वेळनुसार सकाळी 7 वाजता सुरू होईल. नाणेफेक सकाळी 6.30 वाजता होणार.

सामना कोणत्या टीव्ही चॅनलवर प्रसारित होईल?

न्यूझीलंड दौऱ्यावर भारताचे एकदिवसीय सामने प्रसारित करण्याचे अधिकार डीडी स्पोर्ट्सकडे आहेत. हे फक्त डीडी फ्री डिशवर आहे. डीडी फ्री डिशवर डीडी स्पोर्ट्स चॅनलवर तुम्ही सामन्याचा विनामूल्य आनंद घेऊ शकता.

फोन किंवा लॅपटॉपवर लाईव्ह मॅच कशी पाहणार?

भारतातील Amazon प्राइम व्हिडिओ अॅपवर दुसऱ्या वनडेचे लाईव्ह-स्ट्रीमिंग पाहता येईल.