भारताचा सर्वात सीनियर खेळाडू दिनेश कार्तिकला (Dinesh Karthik) रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 विश्वचषकाच्या (IND vs SA) सामन्यादरम्यान पाठीला दुखापत झाली असून, पुढील सामन्यात बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात खेळण्याची शक्यता कमी आहे. कार्तिकने आतापर्यंत या स्पर्धेत चांगली फलंदाजी केलेली नाही आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धही त्याने 15 चेंडूत केवळ सहा धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या डावातील 15 षटके संपल्यानंतर कार्तिक दुखापतीत दिसला. फिजिओ लगेच त्याच्याजवळ पोहोचला आणि काही वेळाने कार्तिक त्याच्यासोबत पॅव्हेलियनमध्ये परतला. भुवनेश्वर कुमारने नंतर पुष्टी केली की कार्तिकला पाठीला दुखापत झाली आहे.
भुवनेश्वर कुमारने दिले अपडेट
तो म्हणाले, "त्यांच्याशी पाठीशी संबंधित एक प्रकरण आहे. फिजिओचा अहवाल आल्यानंतरच याबाबत स्पष्टपणे काही सांगता येईल. भारताचा पुढचा सामना बांगलादेशविरुद्ध 2 नोव्हेंबरला अॅडलेडमध्ये होणार असल्याने कार्तिककडे तंदुरुस्त होण्यासाठी फारच कमी वेळ आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात शेवटच्या पाच षटकांमध्ये ऋषभ पंतने कार्तिकच्या जागी विकेट राखली. (हे देखील वाचा: T20 World Cup 2022: भारत आणि पाकिस्तान आता उपांत्य फेरीसाठी कसे होणार पात्र? येथे जाणून घ्या संपूर्ण समीकरण)
पहा व्हिडीओ
#RishabhPant replaced #DineshKarthik pic.twitter.com/RsmNOCn5ap
— Raj (@Raj54060705) October 30, 2022
ऋषभ पंतला मिळू शकते संधी?
टी-20 विश्वचषकात ऋषभ पंत हा संघाचा भाग आहे त्याने अजून टी-20 विश्वचषकाचा अजुन एकही सामना खेळला नाही आहे. दरम्यान या मध्ये ऋषभ पंतला पुढील सामन्यात संधी मिळण्याची शक्याता आहे. जर दिनेश कार्तिक दुखापतीतुन सावरु शकला नाही तर पंत बांग्लादेशविरुद्ध मैदानात तो उतरु शकतो. गेल्या अनेक काही सामन्या पासुन पंतचा फार्म आपल्याला पाहायला मिळाला नाही तो आशिया कप मध्येही फ्लाप ठरला त्यामुळे त्याला संघात खेळवने हा मोठा प्रश्न संघ व्यवस्थापकासमोर आहे.