Most no balls in Test: चेन्नई (Chennai) येथे सुरू असलेल्या इंग्लंडच्या भारत दौर्याच्या (England Tour of India) पहिल्या कसोटी सामन्याची चौथ्या दिवशी टीम इंडिया (Team India) गोलंदाजांनी सर्वांना चकित करत मोठ्या संख्येने नो-बॉल टाकले. भारतीय गोलंदाजांनी पहिल्या सामन्यात गोलंदाजी करत पाऊल पुढे पडत असताना इंग्लंडविरुद्ध एका सामन्यात सर्वाधिक ‘नोबॉल’ टाकण्याचा एक नकोसा विक्रम आपल्या नावे नोंदवून घेतला. विशेष म्हणजे वेगवान गोलंदाजांपेक्षा फिरकी गोलंदाजांनी सामन्यात सर्वाधिक नो-बॉल टाकले. इंग्लंडविरुद्ध पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांनी एकूण 27 नो-बॉल टाकले. टीम इंडिया गोलंदाजांनी पहिल्या डावात 20 तर दुसऱ्या डावात 7नो-बॉल टाकले. जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) पहिल्या डावात सर्वात जास्त 7, शाहबाझ नदीमने 6, इशांत शर्माने 5 आणि आर अश्विनने 2 नो-बॉल टाकले. यानंतरही भारतीय गोलंदाज लाइनीच्या पुढे जातच राहिले. दुसऱ्या डावात अश्विन-नदीमने प्रत्येकी 3 तर बुमराहने 1 नो-बॉल टाकला. (IND vs ENG 1st Test 2021: चेन्नई टेस्ट सामन्यात भारतीय गोलंदाजांनी मोडला 10 वर्ष जुना रेकॉर्ड, केला लाजीरवाणा कीर्तिमान)
विशेष म्हणजे, कसोटी क्रिकेटच्या एका डावात सर्वाधिक नोबॉल टाकण्याचा विक्रम भारत दौऱ्यावरील इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या संघाच्या नावावर आहे. इंग्लंडने वेस्ट इंडिजविरुद्ध 1986 मध्ये सर्वात जास्त 40 नोबॉल टाकले यानंतर, ऑस्ट्रेलियाने अॅडिलेड सामन्यात 1989 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 40 नोबॉल टाकले होते. भारतीय संघाबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी दिल्ली कसोटी सामन्यात 1979 विंडीजविरुद्व रेकॉर्ड 34 नोबॉल टाकले होते. दुसरीकडे, कसोटी सामन्यात विंडीज संघाने पाकिस्तानविरुद्ध 1987 सामन्यात तब्बल 103 नोबॉलच्या विक्रमची नोंद केली होती. यानंतर ऑस्ट्रेलियाने विंडीजविरुद्ध 1988 कसोटी सामन्यात दुसरे सर्वाधिक 90 नोबॉल टाकले.
भारत आणि इंग्लंड संघात सुरु असलेल्या पहिल्या टेस्टबद्दल बोलायचे तर पाहुण्यासंघाने विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. पाचव्या दिवसाच्या पहिल्या सत्रात टीम इंडियाचे टॉप-5 फलंदाज इंग्लिश संघाच्या गोलंदाजांपुढे ढेर झाले. सत्राअखेर टीम इंडियाचा स्कोर 6 बाद 144 धावा असा आहे. यजमान भारतीय संघाला विजयासाठी आणखी 276 धावांची गरज आहे तर इंग्लंड 4 विकेटच्या शोधात आहेत.