Photo Credit- X

Dwarkanath Sanzgiri Dies: क्रिकेट जगतात शोककळा पसरली आहे. समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचं निधन झालं आहे. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास (Cricket Critic) घेतला. द्वारकानाथ संझगिरी यांच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास(Dwarkanath Sanzgiri Passed Away) घेतला. द्वारकानाथ संझगिरी यांचे काम क्रिकेट जगतात गाजले असले तरी, त्यांनी त्याव्यतिरिक्त बृहन्मुंबई महानगरपालिकेत काम केले होते. त्याव्यतिरिक्त त्यांनी अनेक वृत्तपत्रांत लेखल म्हणून काम केले होते. (Team India New Jersey: इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचे खेळाडू दिसणार नवीन जर्सीत; बीसीसीआयने शेअर केले फोटो (See Photo))

 क्रिकेट क्षेत्रात कारकीर्द

द्वारकानाथ संझगिरी यांनी एकाच वेळी दोन क्षेत्रांत कारकीर्द केली, त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेत अभियंता म्हणून नोकरी केली. तेथून ते 2008 मध्ये मुख्य अभियंता, पाणीपुरवठा प्रकल्प म्हणून सेवानिवृत्त झाले. त्याचबरोबर त्यांनी लेखक आणि सूत्रसंचालक म्हणूनही आपली एक वेगळी ओळख बनवली.

1970 च्या उत्तरार्धात लेखन कारकीर्द सुरू करून, त्यांच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी ‘दिनांक’ आणि ‘श्री’ यासारख्या मासिकांमध्ये नियमितपणे योगदान दिले. भारताने इंग्लंडमध्ये 1983चा विश्वचषक जिंकल्यानंतर, त्यांनी इतर काही मित्रांसह ‘एकच षटकार’ हे पाक्षिक क्रीडा मासिक सुरू केले, ज्यासाठी संझगिरी यांनी कार्यकारी संपादक म्हणून काम केले.

1980 च्या दशकाच्या उत्तरार्धापासून संझगिरींनी ‘आज दिनांक’, ‘सांझ लोकसत्ता’, ‘मिड-डे’, ‘तरुण भारत’, ‘पुढारी’ आणि इतर अनेक प्रकाशनांसाठी स्तंभलेखन केले. लोकसत्तामधील त्यांचे क्रीडा लेख आणि प्रवासवर्णनसंबंधीत स्तंभ खूप गाजले. संझगिरी हे 25 वर्षांहून अधिक काळ ‘सामना’ या मराठी वृत्तपत्रासाठी अनेक क्रिकेट स्पर्धा कव्हर करत होते.

प्रवास, क्रीडा आणि विविध विषयांवर 40 पुस्तके लिहिली

द्वारकानाथ संझगिरी यांनी 1983पासून ते आजपर्यंतचे सर्व 40 पुस्तके लिहिली आहेत. स्तंभलेखनाव्यतिरिक्त, संझगिरी यांनी प्रवास, सामाजिक समस्या, क्रीडा आणि चित्रपट अशा विविध विषयांवर 40 पुस्तके लिहिली आहेत.

द्वारकानाथ संझगिरी यांचा जन्म आणि शिक्षण

द्वारकानाथ संझगिरी यांचा जन्म मुंबईत दादर (पूर्व) येथील हिंदू कॉलनीत 15 नोव्हेंबर 1950 रोजी झाला. द्वारकानाथ संझगिरी यांनी किंग जॉर्ज स्कूल (आताचे राजा शिवाजी विद्यालय) आणि रामनारायण रुईया महाविद्यालयात शिक्षण घेतले. त्यांनी व्हीजेटीआय (वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट, पूर्वीची व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूट), माटुंगा येथून सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले.