Photo Credit- X

India National Cricket Team vs England National Cricket Team: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ (IND vs ENG) यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना 6 फेब्रुवारी रोजी नागपूर येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जाणार आहे. दरम्यान, बहुप्रतिक्षित एकदिवसीय मालिकेपूर्वी, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) भारतीय संघासाठी नवीन एकदिवसीय जर्सी जारी केली आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) सुरू होण्यासाठी आता काही दिवसच शिल्लक आहेत. त्यात इंग्लंडविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत टीम इंडिया त्यांची नवीन जर्सी घालून खेळेल. (India vs England, 1st ODI Match Key Players To Watch Out: टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यात 'या' खेळाडूंवर असतील सर्वांच्या नजरा)

या नव्या जर्सीवर भारतीय तिरंग्याचे रंग आहेत. नवीन जर्सीचा पुढचा आणि मागचा भाग मोठ्या प्रमाणात सारखाच आहे. खांद्याच्या भागात बदल करण्यात आला आहे. पूर्वी खांद्यावर तीन पांढरे पट्टे होते. परंतु नवीन जर्सीमध्ये भारतीय तिरंग्याचे रंग आहेत आणि त्यावर तीन पांढऱ्या पट्टे आहेत. याशिवाय, अशोक चक्राचे प्रतीक असलेला निळा रंग देखील जर्सीचा एक भाग आहे. त्याशिवाय, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 12 फेब्रुवारी रोजी 50 षटकांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना खेळवला जाईल.