विराट कोहली मोडू शकणार सचिन तेंडुलकर याच्या 100 शतकांचा रेकॉर्ड? ब्रेट ली याचे मत जाणून घ्या (Video)
सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली (Photo Credit: Getty Images)

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याच्या 100 शतकांचा विक्रम मोडू शकतो असा ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली (Brett Lee) याचा विश्वास आहे. सचिनचा 'क्रिकेटचा देव' मानले जाते. जगातील एकमेव फलंदाज आहे ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतकं ठोकली आहेत. सचिनने 24 वर्षाच्या कारकिर्दीत हा पराक्रम केला. वनडे क्रिकेटमध्ये सचिनच्या नावावर सर्वाधिक शतकं आहेत. सचिनने आंतरराष्ट्रीय वनडेमध्ये 49 शतकं केली आहेत, तर कोहली 248 सामन्यांत 43 षटकांसह दुसर्‍या क्रमांकावर आहे. सचिन 51 कसोटी शतकंही ठोकली आहेत. दुसरीकडे, कोहली आतापर्यंत 86 टेस्ट सामन्यांमध्ये 27 शतके केली आहेत. लीने विराटचे तीन गुणही सांगितले, ज्याच्या आधारे तो 100 शतकांच्या बाबतीत सचिनला मागे टाकू शकतो. ली म्हणाला की,कौशल्य, तंदुरुस्ती व मानसिक सामर्थ्य या तीन गोष्टींवर सर्व अवलंबून आहे आणि या सर्व गोष्टी कोहलीमध्ये आहेत. (सचिन तेंडुलकर याने 47 वा वाढदिवसानिमित्त आईच्या आशीर्वादाने केली दिवसाची सुरुवात, मिळाली 'अमूल्य' गिफ्ट, पाहा Photo)

स्टार स्पोर्ट्स 'क्रिकेट कनेक्ट' शोमध्ये ब्रेट ली म्हणाले की, "आम्ही येथे एका उत्तम विक्रमाबद्दल बोलत आहोत आणि गेल्या सात-आठ वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीत ज्या प्रकारे तो (विराट कोहली) प्रगती करत आहे, तो नक्कीच साध्य करू शकतो." सचिनचा विक्रम मोडणे सोपे नाही, असा लीचा विश्वास आहे. ली पुढे म्हणाला की, "पण कोणीतरी सचिन तेंडुलकरला मागे टाकू शकेल असे तुम्ही कसे म्हणू शकता? तो येथे देव आहे. देवापेक्षा कोणीही श्रेष्ठ असू शकेल, आपण थांबू आणि पाहू!” लीच्या म्हणण्यानुसार, तीन गोष्टी ज्या कोहलीच्या बाजूने आहेत आणि या तिघांमुळे तो क्रिकेटचा देव सचिनचा विक्रम मोडू शकतो. ब्रेट ली म्हणाला, 'पहिली गोष्ट म्हणजे प्रतिभा. त्यांच्यात नक्कीच पहिली आणि सर्वात महत्वाची प्रतिभा आहे. यानंतर फिटनेस येतो. तो खूप तंदुरुस्त आहे आणि वयाच्या 30 व्या वर्षी तो मानसिकदृष्ट्याही तंदुरुस्त आहे. घर, बायको आणि जेव्हा होइल तेव्हा मुलांपासून दूर राहण्यासाठी मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहणे महत्वाचे आहे."

ऑस्ट्रेलियाकडून 76 टेस्ट, 221 वनडे आणि 25 टी-20 सामने खेळेलेला ली म्हणाला की, "जर तो अशा प्रकारे मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहिला तर मला असे वाटते की त्याच्याकडे हे तीन गुण आहेत, ज्याद्वारे तो सचिनला मागे टाकू शकेल."