बेन स्टोक्सने एमएस धोनी याच्या खेळाडूवृत्तीवर केला प्रश्न, टीम इंडियाच्या 2019 वर्ल्ड कप पराभवाचे 'या' 3 खेळाडूंवर फोडले खापर
बेन स्टोक्स, एमएस धोनी (Photo Credit: Getty)

2019 वर्ल्ड कपच्या (World Cup) ग्रुप सामन्यात भारताला (India) यजमान इंग्लंडविरुद्ध (England) पराभवाला सामोरे जावे लागले. भारताचा वर्ल्ड कपमधील हा पहिला पराभव होता. या सामन्यानंतर एमएस धोनी (MS Dhoni) याच्या बॅटिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. भारताला विजयासाठी 11 ओव्हरमध्ये 112 धावांची गरज होती, धोनी आणि केदार जाधव अखेरपर्यंत खेळपट्टीवर टिकून राहिले, मात्र टीमसाठी विजय मिळवू शकले नाही. स्टोक्सने केवळ धोनीच नाही तर विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मावरही (Rohit Sharma) प्रश्न केला आहे. इंग्लंडचा स्टार अष्टपैलू बेन स्टोक्सने भारताच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उभे केले. वर्ल्ड कप दरम्यान टीम इंडियाविरुध्द स्टोक्सने म्हटले की रोहित शर्मा आणि विराट कोहलीची भागीदारी 'रहस्यमय' असल्याचे त्यांना आढळले, तर धोनी उत्कटतेने वागला नाही. स्टोक्सने कर्णधार कोहलीच्या तक्रारींना एका बाजूला असलेल्या '59 मीटर' हद्दीबद्दल 'व्हिनेजिंग' म्हटले. बर्मिंघम येथे हा खेळ होता आणि इंग्लंडच्या 7 बाद 337 च्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत भारताला 31 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. (एमएस धोनी याला बिर्याणी खाऊ न घालणे मोहम्मद कैफ याला पडले महागात? माजी भारतीय फलंदाजाने सुनावला रंजक प्रसंग)

त्याच्या 'ऑन फायर' पुस्तकात स्टोक्सने वर्ल्ड कपमधील इंग्लंडच्या प्रत्येक खेळाचे विश्लेषण केले. स्टोक्स म्हणाला, “जेव्हा धोनी फलंदाजीला आला तेव्हा भारताला 11 ओव्हरमध्ये 112 धावांची आवश्यकता होती आणि त्याने विचित्र पद्धतीने फलंदाजी केली. तो षटकारांपेक्षा एकेरी धाव घेण्यासाठी अधिक उत्सुक होता. एक डझन चेंडू शिल्लक असतानाही भारत जिंकू शकला असता." स्टोक्स म्हणाला, “धोनी आणि केदार जाधवच्या भागीदारीत विजयाची फारशी इच्छा फार कमी किंवा नव्हती. माझ्या दृष्टीने विजय अद्याप शक्य असता जर त्यांनी चांगली फलंदाजी केली असती,” स्टोक्सने लवकरच प्रकाशित होणाऱ्या पुस्तकात लिहिले. इंग्लंडच्या ड्रेसिंग रूमला असे वाटले की धोनीने सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत नेला असता. धोनीने या सामन्यात 31 चेंडूत नाबाद 42 धावा केल्या.

दुसरीकडे, इंग्लंडचे गोलंदाज क्रिस वोक्स आणि जोफ्रा आर्चरने रोहित व कोहलीसमोर चांगली गोलंदाजी केली. त्याने 138 धावांच्या भागीदारीसाठी जवळपास 27 ओव्हरचा खेळ केला. तो म्हणाला, "रोहित आणि विराट ज्या पद्धतीने खेळत होते ते रहस्यमयच होते. मला माहित आहे की या काळात आम्ही शानदार गोलंदाजी केली, पण त्यांनी ज्या प्रकारे फलंदाजी केली, ती अगदी विचित्र वाटली. या दोघांनी फलंदाजीने सामन्यात आपल्या संघाला मागे ढकलले. आमच्या संघावर दबाव आणण्याची त्यांनी कोणतीही इच्छा दाखविली नाही. आमच्या रणनीतीनुसार ते खेळत होते." स्टोक्स म्हणाला की, कोहलीने सीमारेषा आणखी लहान असण्याबद्दल बोलला, जे त्याला 'थोडेसे विचित्र' वाटले.