भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (BCCI President Sourav Ganguly) यांनी स्वत:ला होम क्वारंटाईन करुन घेतले आहे. यास कारण म्हणजे गांगुलीचा मोठा भाऊ आणि बंगाल क्रिकेट असोसिएशनचे सचिव स्नेहाशीष (Snehashish) यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह (COVID-19 Positive) आला आहे. स्नेहाशीष यांची पत्नी आणि सासू-सासरे यांना महिनाभर आधी कोरोनाची लागण झाली होती. स्नेहाशीष यांना मागील काही दिवसांपासून ताप होता. त्यानंतर त्यांना बेल्ले व्ह्यू हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. बुधवारी रात्री त्यांचा कोरोना अहवाल आला. हा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर सौरव गांगुली यांनी स्वत:ला होम क्वारंटाईन (Home Quarantine) करून घेतले आहे.
स्नेहाशीष यांनी खासगी केंद्रातून स्वत:ची क्वारंटाईन चाचणी करुन घेतली. ती चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांना तात्काळ बेल्ले व्ह्यू हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. स्नेहाशीष ही सौरव गांगुली सोबत एकाच घरात राहत असल्याकारणाने त्यांनी स्वत:ला होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेतला.
हेदेखील वाचा- BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या घरापर्यंत पोहोचला कोरोना विषाणू; कुटुंबातील चौघांना Coronavirus ची लागण
स्नेहाशीष लवकरच दुसरी चाचणी करणार असल्यामुळे सौरव गांगुलीसह कुटुंबातील सर्व सदस्य आता सेल्फ आयसोलेट झाले आहेत आणि त्यांची तपासणी करण्यात येणार आहे. सुरुवातीला मोमिनपूर येथे स्नेहाशीष हे राहत होते, परंतु कुटुंबातील सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर ते गांगुली राहत असलेल्या घरी शिफ्ट झाल्यामुळे आता सौरवलाही क्वारंटाईन व्हावे लागले आहे.
मागील महिन्यात स्नेहाशीषची पत्नी, सासू आणि सासरे तसेच त्यांच्या घरात काम करणाऱ्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. या चौघांनीही आरोग्याची तक्रार होती त्यानंतर सर्वांमध्ये कोविड-19 ची लक्षणे आढळली. या चौघांचा चाचणी अहवाल सकारात्मक आल्यानंतर चौघांनाही खासगी नर्सिंग होममध्ये हलविण्यात आले होते.