Bangladesh National Cricket Team vs South Africa National Cricket Team: बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिला दिवसाचा खेळ आज होत आहे. ढाका शेरे बांगला नॅशनल स्टेडियमवर सामना सुरू आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात फलंदाजी करताना बांगलादेशची फलंदाजी करताना सुरूवात खराब झाली. पहिल्या डावात बांगलादेशचा संघ 40.1 षटकात 106 धावांवर गारद झाला आहे. बांगलादेशकडून महमुदुल हसन जॉयने 97 चेंडूत सर्वाधिक 30 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून गोलंदाजी करताना विआन मुल्डरने 8 षटकांत 22 धावा देत 3 बळी घेतले. तर कागिसो रबाडा आणि केशव महाराज यांनीही 3-3 बळी घेतले. याशिवाय डॅन पिएडला 1 बळी मिळाला. (हेही वाचा - Bangladesh vs South Africa 1st Test 2024 Day 1 Scorecard: बांगलादेशचा पहिला डाव 106 धावांवर मर्यादित; विआन मुल्डर, कागिसो रबाडा आणि केशव महाराज यांनी घेतल्या प्रत्येकी तीन विकेट )
पाहा पोस्ट -
Dutch-Bangla Bank Bangladesh 🆚 South Africa Test Series 2024
Stumps | Day 01 | South Africa lead by 34 runs#BCB #Cricket #BANvSA #WTC25 #TestCricket pic.twitter.com/F753aBzdhg
— Bangladesh Cricket (@BCBtigers) October 21, 2024
बांगलादेशला लवकर बाद केल्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या साउथ आफ्रिकन फलंदाजांना बांग्लादेश गोलंदाजांनी जास्त स्थिरावू दिले नाही. दिवसाअखेर साऊथ आफ्रिकेच्या संघाने 6 बाद 140 धावा केल्या असून कायल वेर्रेने (18) आणि विआन मुल्दर (17) हे नाबाद खेळत आहे. बांगलादेशकडून तैजुल इस्लामने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या तर टोनी डी झॉर्झीने दक्षिण आफ्रिकेकडून सर्वाधिक 30 धावांची खेळी केली.