Bangladesh vs South Africa 1st Test 2024 Day 1 Scorecard: बांगलादेशचा पहिला डाव 106 धावांवर मर्यादित; विआन मुल्डर, कागिसो रबाडा आणि केशव महाराज यांनी घेतल्या प्रत्येकी तीन विकेट
बांगलादेश क्रिकेट संघ विरुद्ध दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ आज, 21 ऑक्टोबर रोजी ढाका येथील शेरे बांगला राष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जात आहे. बांगलादेशचा संघ पहिल्या डावात 106 धावांत गारद झाला आहे.
Bangladesh National Cricket Team vs South Africa National Cricket Team 1st Test 2024 Day 1 Scorecard: बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिला दिवसाचा खेळ आज होत आहे. ढाका शेरे बांगला नॅशनल स्टेडियमवर सामना सुरू आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात फलंदाजी करताना बांगलादेशची फलंदाजी करताना सुरूवात खराब झाली. पहिल्या डावात बांगलादेशचा संघ 40.1 षटकात 106 धावांवर गारद झाला आहे. बांगलादेशकडून महमुदुल हसन जॉयने 97 चेंडूत सर्वाधिक 30 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून गोलंदाजी करताना विआन मुल्डरने 8 षटकांत 22 धावा देत 3 बळी घेतले. तर कागिसो रबाडा आणि केशव महाराज यांनीही 3-3 बळी घेतले. याशिवाय डॅन पिएडला 1 बळी मिळाला.
बांगलादेशचा पहिला डाव 106 धावांवर मर्यादित
CHANGE OF INNINGS 🔄
South Africa strikes early and hard! ⚡
Bangladesh are bowled out for 106 on Day 1.
Time for the Proteas to build a solid lead! 💪🏏🇿🇦 #WozaNawe #BePartOfIt #BANvsSA pic.twitter.com/SZ15SzcJHp
— Proteas Men (@ProteasMenCSA) October 21, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 21, 2024 02:58 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

