भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना (WTC Final 2023) पुढील महिन्यात जूनमध्ये होणार आहे. दोन्ही संघांमधील हा अंतिम सामना 7 ते 11 जून दरम्यान इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर खेळवला जाईल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पहिल्या सत्रात टीम इंडियाला न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. पण आता टीम इंडियाला एका दशकानंतर आयसीसी ट्रॉफीवर कब्जा करण्याची मोठी संधी आहे. त्याचवेळी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने या सामन्यासाठी अनिल पटेल (Anil Patel) यांची भारतीय संघाच्या व्यवस्थापकपदी नियुक्ती केली आहे.
अनिल पटेल सध्या गुजरात क्रिकेट असोसिएशनचे सचिव
अनिल पटेल सध्या गुजरात क्रिकेट असोसिएशनचे सचिव आहेत. याआधीही ते टीम इंडियासाठी काही मालिकांमध्ये व्यवस्थापकपदावर होते. यामध्ये त्यांनी यापूर्वी 2017, 2018 आणि 2019 मध्ये व्यवस्थापकाची भूमिका बजावली आहे. त्याचवेळी बीसीसीआयने या अंतिम सामन्यासाठी टीम इंडियाची घोषणा आधीच केली आहे. (हे देखील वाचा: WTC Final 2023: इंग्लंडमध्येच 10 वर्षांनंतर आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची भारताला मोठी संधी, 'या' टॉप 5 भारतीय खेळाडूंवर असणार नजर)
Anil Patel appointed as Indian team's manager for the WTC final. pic.twitter.com/jrX8fc34Y2
— BAIBHAV SINGH (@RajBaibhav4) May 17, 2023
टीम इंडिया खेळणार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली
रोहित शर्मा जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनलमध्ये टीम इंडियाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. तर उपकर्णधाराची घोषणा झालेली नाही. चेतेश्वर पुजाराला उपकर्णधार बनवण्याची चर्चा असली तरी. त्याचवेळी अजिंक्य रहाणेचे प्रदीर्घ कालावधीनंतर कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. अशा परिस्थितीत या सामन्यात सर्वांच्या नजरा रोहित, रहाणे, पुजारा आणि विराट कोहली यांच्यावर असतील.
फायनलसाठी भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, इशान किशन (विकेटकीपर).
राखीव खेळाडू - ऋतुराज गायकवाड, मुकेश कुमार, सूर्यकुमार यादव.