अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा (Photo Credit: ANI)

ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऐतिहासिक बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) कसोटी मालिकेत विजयानंतर भारतीय संघ (Indian Team) मायदेशी परतला आहे. ब्रिस्बेन टेस्ट सामन्यात यजमान संघाचा पराभव करत टीम इंडियाने (Team India) कांगारू देशात कसोटी मालिका विजयाची परंपरा कायम ठेवत इतिहास रचला. आता आपणास घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध कसोटी, टी-20 मालिकेसाठी तयारीला लागणार आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) वगळता उर्वरित खेळाडू 5 महिन्यांनंतर मायदेशी परतत आहेत. 20 ऑगस्ट रोजी सर्व खेळाडू आयपीएलसाठी युएईला रावाना झाले होते जिथून 12 नोव्हेंबर रोजी टीम ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर रवाना झाली. आणि आता तब्बल पाच महिन्यानंतर खेळाडू आपापल्या घरी परतले आहेत. टीम इंडियाचे प्रशिक्षक रवि शास्त्री (Ravi Shastri), अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane), रोहित शर्मा आणि पृथ्वी शॉ मुंबई विमानतळावर दाखल झाले तर रिषभ पंत दिल्ली एअरपोर्टवर स्पॉट झाला. एअरपोर्टवर टीम इंडियाचे फुलांनी स्वागत करण्यात आले. (IND vs ENG Test Series 2021: इंग्लंडविरुद्ध टेस्ट मालिकेसाठी स्टेडियममध्ये प्रेक्षकांना परवानगी मिळण्याची शक्यता, BCCI लागली कामाला)

ब्रिस्बेन टेस्टच्या अंतिम दिवशी संघाला विजयीरेष ओलांडून देणारा पंत म्हणाला, "बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सलग तिसऱ्या जिंकल्याबद्दल खूप आनंद झाला आहे. ऑस्ट्रेलिया दौर्‍यावरील त्यांच्या खेळामुळे संपूर्ण संघही खूप खूष आहे." ANI ने टीम इंडिया मायदेशी पोहचल्याचे फोट शेअर केले आहेत. टीम इंडियाचे क्रिकेटपटू काही दिवसांच्या विश्रांतीनंतर 27 जानेवारीपासून बायो बबलमध्ये प्रवेश करतील. भारत आणि इंग्लंड यांच्यात चार कसोटी सामन्यांची मालिका 5 फेब्रुवारीपासून खेळली जाणार आहे. या मालिकेपूर्वी सर्व खेळाडू बायो बबलमध्ये दाखल होतील. पहिले दोन कसोटी सामने चेन्नईत खेळले जाणार आहेत.

रोहित शर्मा

रिषभ पंत 

पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे, तर इंग्लंडचा संघ पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी आज जाहीर होणार आहे. विराट कोहली, जसप्रीत बुमराह, आर अश्विन, रवींद्र जडेजा या दिग्गज क्रिकेटपटूंच्या अनुपस्थितीत टीम इंडियाने ब्रिस्बेन कसोटी जिंकून मालिका जिंकली. अ‍ॅडिलेड येथे खेळलेला पहिल्या सामन्यानंतर विराट कोहली पितृत्व रजेवर मायदेशी परतला होता. यानंतर रहाणेने उर्वरित तीन कसोटी सामन्यात संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सांभाळली. अ‍ॅडिलेडमध्ये टीम इंडिया दुसर्‍या डावात केवळ 36 धावाच करू शकली आणि त्याला 8 विकेटने पराभवाचा सामना करावा लागला.