Syed Mushtaq Ali Trophy 2024: आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळणारा भारतीय फलंदाज अभिषेक शर्माने (Abhishek Sharma) गुरुवारी मेघालयविरुद्ध झंझावाती शतक झळकावून एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. पंजाबचा कर्णधार असलेल्या अभिषेकने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी सामन्यात अवघ्या 28 चेंडूत शतक झळकावून भारतासाठी संयुक्त सर्वात वेगवान टी-20 शतक झळकावले. त्याच्या 11 षटकारांच्या स्फोटक खेळीमुळे पंजाबने 10 व्या षटकातच 143 धावांचे लक्ष्य गाठले. या कामगिरीमुळे त्याची स्पर्धेतील सरासरीही वाढली आहे. गुरुवारी झालेल्या सामन्यापूर्वी त्याने सहा डावात 149 धावा केल्या होत्या. यापैकी तो एकदाच पन्नास किंवा त्याहून अधिक धावा करू शकला.
ऋषभ पंतचा विक्रम मोडला
गुजरातच्या उर्विल पटेलने त्रिपुराविरुद्ध 28 चेंडूत शतक झळकावून या स्पर्धेत एक विक्रम केला होता, जे भारतासाठी टी-20 क्रिकेटमधील सर्वात जलद शतक होते. येथे त्याने यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतचा विक्रम मोडला. त्याने 2018 मध्ये हिमाचल प्रदेश विरुद्ध 32 चेंडूत शतक झळकावले होते. टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतकाचा विक्रम एस्टोनियाच्या साहिल चौहानच्या नावावर आहे, ज्याने सायप्रसविरुद्ध केवळ 27 चेंडूत शतक झळकावले होते.
हे देखील वाचा: IND vs SL U19 Asia Cup Semi Final Live Streaming: भारताचा उपांत्य फेरीत श्रीलंकेशी सामना, कधी अन् कुठे पाहणार लाइव्ह? घ्या जाणून
अभिषेकने सूर्यकुमारला मागे सोडले
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमधील अभिषेकचे हे चौथे शतक आहे. यासोबतच त्याने स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक टी-20 शतके झळकावण्याचा विक्रमही केला. त्याने 29 चेंडूत 8 चौकार आणि 11 षटकारांसह नाबाद 106 धावा केल्या. अभिषेकने टीम इंडियाचा टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादवचा एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक टी20 षटकार मारण्याचा विक्रमही मागे टाकला. सूर्यकुमारने 2022 मध्ये 41 डावांत 85 षटकार ठोकले होते आणि अभिषेकने यावर्षी केवळ 38 डावांत 86 षटकार मारून हा पराक्रम केला आहे.