Afghanistan Tour Of Zimbabwe 2024-25: अफगाणिस्तान क्रिकेट संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. जिथे एकदिवसीय आणि टी-20 मालिका खेळवली जाईल. रशीद खानकडे टी-20 मालिकेसाठी कर्णधारपद सोपवण्यात आले आहे, तर एकदिवसीय मालिकेसाठी हशमतुल्ला शाहिदीला कर्णधारपद देण्यात आले आहे. याशिवाय मुजीब उर रहमानचे दीर्घ कालावधीनंतर राष्ट्रीय संघात पुनरागमन झाले आहे. मुजीब गेल्या अनेक महिन्यांपासून राष्ट्रीय क्रिकेट संघापासून दूर होता. अलीकडेच तो उजव्या पायाच्या दुखापतीतून बरा झाला आहे. याशिवाय देशांतर्गत स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या झुबैद अकबरीलाही प्रथमच राष्ट्रीय संघात संधी मिळाली आहे. (हे देखील वाचा: Pakistan Beat Zimbabwe, 1st T20I Match 2024 Scorecard: पाकिस्तानने झिम्बाब्वेचा 57 धावांनी केला पराभव, सुफियान मुकीम आणि अबरार अहमद यांनी केली घातक गोलंदाजी; येथे वाचा सामन्याचे स्कोरकार्ड
Happy with our white-ball lineups for the Zimbabwe tour!? 🏏
Get all the details about our T20I and ODI squads and learn about the slight schedule adjustment for the upcoming white-ball games here: 👉 https://t.co/raSe3DCF9b#AfghanAtalan | #ZIMvAFG |… pic.twitter.com/GLy3XXBXWr
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) December 1, 2024
मुजीबच्या परतल्यावर मुख्य निवडकर्ता अहमद शाह म्हणाले की, आमचा मुख्य फिरकीपटू मुजीब उर रहमान दुखापतीतून सावरताना आणि निवडीसाठी उपलब्ध असल्याचे पाहून खूप आनंद होतोय. तो आमच्या संघाचा महत्त्वाचा सदस्य आहे आणि आम्हाला आशा आहे की तो अफगाणिस्तानसाठी चांगली कामगिरी करत राहील. या दौऱ्याची सुरुवात 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेने होईल. पहिला सामना 11 डिसेंबरला तर शेवटचा सामना 14 डिसेंबरला होणार आहे.
एकदिवसीय मालिका 17 डिसेंबरपासून होणार सुरुवात
3 सामन्यांची एकदिवसीय मालिका 17 डिसेंबरपासून सुरू होणार आहे, तर शेवटचा एकदिवसीय सामना 21 डिसेंबर रोजी होणार आहे. यावेळी अफगाणिस्तान आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही सहभागी होणार आहे. ज्याचे आयोजन यावेळी पाकिस्तानमध्ये केले जाणार आहे.
टी-20 संघ: रशीद खान (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), मोहम्मद इशाक (यष्टीरक्षक), सेदीकुल्लाह अटल, हजरतुल्ला झाझई, मोहम्मद नबी, दरविश रसूल, झुबैद अकबरी, गुलबद्दीन नायब, करीम जन्नत, अजमातुल्ला उमरझाई, नांगेबाल उमरझाई, मुहम्मद उमरझाई रेहमान, नूर अहमद, फजल हक फारुकी, फरीद अहमद आणि नवीन उल हक.
एकदिवसीय संघ: हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), रहमत शाह (उपकर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), इक्रम अलीखिल (यष्टीरक्षक), अब्दुल मलिक, सेदीकुल्लाह अटल, दरविश रसूली, अजमतुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, गुलबद्दीन नायब, राशिद खान. नांग्याल खरोती, एएम गझनफर, मुजीब उर रहमान, फजल हक फारुकी, बिलाल सामी, नवीद झदरन आणि फरीद अहम मलिक.