Zimbabwe National Cricket Team vs Pakistan National Cricket Team, 1st T20I Match 2024 Scorecard Update: झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना आज म्हणजेच 1 डिसेंबर रोजी खेळला गेला. बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लबमध्ये दोन्ही संघांमधील सामना खेळला गेला. पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात पाकिस्तान संघाने झिम्बाब्वेचा 57 धावांनी पराभव केला आहे. यासह पाकिस्तानने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेत सिकंदर रझा झिम्बाब्वेचे नेतृत्व करत आहे. तर पाकिस्तानची कमान सलमान आघाच्या हातात आहे. (हे देखील वाचा: IND vs AUS, Border-Gavaskar Trophy 2024-25: ॲडलेडच्या मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलियाची 'अशी' आहे कामगिरी, दोन्ही संघांच्या आकडेवारीवर एक नजर)
After a slow start, Pakistan's bowlers step up to take the last 8 wickets for just 31 runs 🔥
🔗 https://t.co/J9mgxIQdIL | #ZIMvPAK pic.twitter.com/TvdrK6uMQz
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) December 1, 2024
दरम्यान, पहिल्या टी-20 सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या पाकिस्तान संघाची सुरुवात निराशाजनक झाली आणि अवघ्या 18 धावांवर संघाला पहिला मोठा धक्का बसला. पाकिस्तान संघाने 20 षटकांत 4 गडी गमावून 165 धावा केल्या. पाकिस्तानकडून तय्यब ताहिरने सर्वाधिक नाबाद 39 धावांची खेळी केली. या झंझावाती खेळीदरम्यान तय्यब ताहिरने 25 चेंडूत चार चौकार आणि एक षटकार ठोकला. तय्यब ताहिरशिवाय उस्मान खानने 39 धावा केल्या.
दुसरीकडे, रिचर्ड नगारवाने झिम्बाब्वे संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. झिम्बाब्वेसाठी रिचर्ड नगारवा, सिकंदर रझा, वेलिंग्टन मसाकादझा आणि रायन बर्ल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. हा सामना जिंकण्यासाठी झिम्बाब्वे संघाला 20 षटकात 166 धावा करायच्या होत्या.
लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या झिम्बाब्वे संघाची सुरुवातही निराशाजनक झाली आणि अवघ्या 18 धावांवर संघाचे दोन फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले. झिम्बाब्वेचा संपूर्ण संघ 15.3 षटकात केवळ 108 धावांवर गारद झाला. झिम्बाब्वेकडून कर्णधार सिकंदर रझाने सर्वाधिक 39 धावांची खेळी खेळली. सिकंदर रझाशिवाय तदिवनाशे मारुमणीने 33 धावा केल्या.
अबरार अहमदने पाकिस्तान संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. पाकिस्तानकडून सुफियान मुकीम आणि अबरार अहमद यांनी प्रत्येकी सर्वाधिक तीन बळी घेतले. सुफियान मुकीम आणि अबरार अहमद यांच्याशिवाय हरिस रौफने दोन बळी घेतले. मालिकेतील दुसरा सामना मंगळवारी म्हणजेच 3 डिसेंबर रोजी बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लब येथे संध्याकाळी 5 वाजता खेळवला जाईल.