Abhisekh Sharma And Ruturaj Gaikwad (Photo Credit - X)

Team India Squad for Sri Lanka Tour 2024: बीसीसीआयने (BCCI) या महिन्यात होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा (Team India Squad for Sri Lanka Tour) केली आहे. या दौऱ्यात भारतीय संघाला 3 सामन्यांची एकदिवसीय आणि 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. भारतीय निवड समितीने आपल्या निर्णयाने चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. त्यांनी सूर्यकुमार यादवकडे (SuryaKumar Yadav) टी-20 संघाचे कर्णधारपद सोपवले आहे. रोहित शर्माने (Rohit Sharma) यापूर्वीच टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तरीही तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये कर्णधार आहे. निवड समितीने श्रीलंका दौऱ्यासाठी निवडलेल्या टी-20 संघातून अभिषेक शर्मा, ऋतुराज गायकवाड, इशान किशन, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, आवेश खान आणि मुकेश कुमार यांना वगळले आहे.

शतक असूनही अभिषेकला बाहेरता रस्ता

यापैकी अभिषेक आणि ऋतुराजच्या नावाने सगळ्यात आश्चर्यचकित केले आहे. अभिषेकने नुकतेच झिम्बाब्वे दौऱ्यावर पदार्पण केले आणि दुसऱ्याच सामन्यात शतक झळकावले. तर ऋतुराजनेही चमकदार कामगिरी केली. अशा स्थितीत दोघेही खासकरून अभिषेक बाहेर असल्याचे चाहत्यांना पचनी पडलेले नाही. झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात अभिषेकने 47 चेंडूत 100 धावांची शानदार खेळी केली. या मालिकेत शुभमन गिलने कर्णधारपदाची धुरा सांभाळली. मात्र, या श्रीलंका दौऱ्यातही त्याला बंपर फायदे मिळाले आहेत. अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने श्रीलंकेविरुद्धच्या दोन्ही मालिकांमध्ये गिलला उपकर्णधारपद दिले आहे.

खराब कामगिरीनंतरही परागला बंपर फायदा 

याशिवाय झिम्बाब्वे दौऱ्यात रियान परागलाही बंपर फायदा झाला. त्याची टी-20 तसेच एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे परागने झिम्बाब्वे दौऱ्यावर खराब कामगिरी केली होती. त्याने 3 सामन्यांच्या 2 डावात 2 आणि 22 धावा केल्या. मात्र अभिषेक आणि ऋतुराजला पुढे ठेवून त्याची निवड करण्यात आली आहे. (हे देखील वाचा: Team India Squad for Sri Lanka Tour 2024: गौतम गंभीर येताच भारतीय संघात मोठे बदल, नव्या चेहऱ्यांना मिळाली संधी तर अय्यर-राहुलचे पुनरागमन)

केएल राहुल आणि श्रेयसचे वनडेमध्ये पुनरागमन

केएल राहुल आणि श्रेयसचे वनडेमध्ये पुनरागमन झाले आहे. याचाच अर्थ हार्दिक पांड्याचीही उपकर्णधारपदावरून हक्कलपट्टी झाली आहे. याआधी तो टी-20 मध्ये कर्णधारपदाच्या शर्यतीत होता. याशिवाय यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतचे वनडे संघात पुनरागमन झाले आहे. संजू सॅमसनची टी-20 मध्ये निवड झाली. तर केएल राहुल आणि श्रेयस अय्यरचे वनडेत पुनरागमन झाले आहे. वेगवान गोलंदाज हर्षित राणाला वनडेमध्ये संधी मिळाली आहे.

श्रीलंका दौऱ्यावर भारताचा एकदिवसीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा.

श्रीलंका दौऱ्यावर भारताचा टी-20 संघ

सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद, मोहम्मद सिराज