IND vs NZ 2nd ODI Probable Playing 11: टीम इंडियासाठी 'करो किंवा मरो'ची लढाई, काय असु शकते भारताची संभाव्य प्लेइगं 11
Team India (Photo Credit - Twitter)

IND vs NZ 2nd ODI 2022: ऑकलंडमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाला न्यूझीलंडकडून (IND vs NZ) दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. शिखर धवनच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाचा (Team India) 306 धावा करूनही पराभव झाला. न्यूझीलंडचा टॉम लॅथम आणि कर्णधार केन विल्यमसन यांनी शानदार खेळी करत भारताला पराभवाचा धक्का दिला. लॅथमने शतक तर विल्यमसनने अर्धशतक झळकावले. आता दुसरा सामना जिंकून टीम इंडियाला मालिकेत बरोबरी साधायची आहे. इडन पार्कवर खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाच्या फलंदाजांनी चांगला खेळ दाखवला.

शुभमन गिल आणि शिखर धवन या भारताच्या सलामीच्या जोडीने निश्चितच संथ सुरुवात केली होती पण नंतर वेगवान धावा केल्या आणि मधल्या फळीसाठी एक चांगला मंच तयार केला. गिल आणि धवन या दोघांनीही अर्धशतके झळकावली. त्याच्याशिवाय श्रेयस अय्यरने 80 धावांची खेळी केली. (हे देखील वाचा: IND vs NZ 2nd ODI 2022 Hamilton Weather Report: दुसऱ्या सामन्यात टीम इंडिया येवु शकते अडचणीत, पावसाचा धोका)

प्लेइंग-11 मध्ये काय बदल होईल

टीम इंडियाने 50 षटकात 306 धावा केल्या मात्र न्यूझीलंडने हे लक्ष्य सहज गाठले. हे लक्ष्य वाचवण्यात भारतीय गोलंदाजांना अपयश आले. भारतीय गोलंदाजीत सहाव्या गोलंदाजाची कमतरता स्पष्टपणे दिसून आली. दुसऱ्या वनडेत शिखर धवन ही उणीव पूर्ण करू शकतो आणि अशा स्थितीत प्लेइंग-11 मध्ये बदल होऊ शकतो. टीम इंडिया पहिल्या वनडेत पंत आणि सॅमसन या दोन यष्टिरक्षकांसह उतरली. अशा परिस्थितीत संघ व्यवस्थापन सहव्या गोलंदाजीच्या पर्यायासाठी त्यापैकी एकाला वगळू शकते.

भारताची संभाव्य प्लेइगं 11

शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत/संजू सॅमसन, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, उमरान मलिक, अर्शदीप सिंह, युझवेंद्र चहल/कुलदीप यादव