There is Chances of Rain During IND vs NZ 2nd ODI (Photo Credits: @ddsportschannel/Twitter)

IND vs NZ 2nd ODI 2022: रविवारी हॅमिल्टनमध्ये भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील मालिकेतील दुसऱ्या वनडेमध्ये पावसाचा धोका आहे. दुसरीकडे, जर आपण अंदाज पाहिला तर ही बातमी देखील क्रिकेट चाहत्यांना निराश करू शकते. पहिला सामना गमावल्यानंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांना आशा आहे की सेडन पार्कवर टीम इंडिया दमदार पुनरागमन करून मालिका बरोबरीत आणेल, परंतु पावसामुळे (Hamilton Weather Report) सगळ काही बिघडू शकते. यापूर्वी टी-20 मालिकेतही पावसाने मजा उधळली होती. यजमान किवी संघ पहिला सामना 7 गडी राखून सामना जिंकून मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. दुसरा सामना रविवारी (भारतीय वेळेनुसार) सकाळी 7 वाजता सुरू होणार आहे.

हॅमिल्टनमध्ये  कसे असणार हवामान?

हवामान विभागानुसार हॅमिल्टनमध्ये स्थानिक वेळेनुसार रविवारी दुपारी सुमारे चार तास पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचा अर्थ स्थानिक वेळेनुसार दुपारी 2 वाजता होणार्‍या टॉसलाही विलंब होऊ शकतो. पण सेडन पार्कमध्ये पाण्याचा निचरा करण्याची चांगली व्यवस्था आहे. अशा परिस्थितीत 4 वाजेपर्यंत पाऊस थांबल्यास कमी षटकांचा सामना पाहता येईल. अंदाजाबाबत बोलायचे झाले तर दुपारी 1 नंतर तितकेच ढगाळ वातावरण राहील. सायंकाळी 5 वाजेपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. यानंतर संध्याकाळी 7 आणि 9 वाजता पुन्हा पाऊस पडू शकतो. म्हणजे इंद्रदेव या सामन्याला त्रास देत राहतील. (हे देखील वाचा: IND vs NZ 1st ODI 2022 Video Highlights: न्यूझीलंडने पहिला वनडे सामना 7 गडी राखून जिंकला, पहा व्हिडीओ हायलाईटस)

Hamilton Weather Report

टीम इंडिया येवु शकते अडचणीत

खरंतर, टी-20 मालिकेतही असंच काहीसं पाहायला मिळालं, पहिल्याच सामन्यात पावसानं दडी मारली होती. दुसरा सामना टीम इंडियाने जिंकला आणि शेवटचा सामना पुन्हा पावसामुळे बरोबरीत सुटला. आता या वनडे मालिकेबद्दल बोलायचे झाले तर न्यूझीलंड 1-0 ने पुढे आहे. हॅमिल्टनचा हवामानाचा अंदाज भारतासाठी चांगला नाही. सामना झाला नाही तर न्यूझीलंड आघाडीवर असेल. त्यानंतर शेवटचा सामना 30 नोव्हेंबरला क्राइस्टचर्चमध्ये होणार आहे. तिथे सामना झाला आणि भारत जिंकला तरी मालिका जिंकता येणार नाही. तो सामनाही झाला नाही तर वनडे मालिका न्यूझीलंडच्या नावावर होईल.