Team India (Photo Credit - Twitter)

IND vs BAN 1st Test: टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जहूर अहमद स्टेडियमवर खेळवला जात आहे. टीम इंडियाचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चौथ्या दिवसाचा खेळ संपला आहे. शाकिब अल हसन 40 आणि मेहदी हसन मिराज 9 धावा करून खेळत आहेत. टीम इंडियाने पहिल्या डावात 404 धावा केल्या होत्या. त्याचवेळी बांगलादेशचा पहिला डाव अवघ्या 150 धावांवर आटोपला. टीम इंडियाने वेगवान फलंदाजी करताना दुसरा डाव 258 धावांवर घोषित केला. सलामीवीर शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजाराने शानदार शतके झळकावली.

बांगलादेशला हा सामना जिंकण्यासाठी 513 धावा करायच्या आहेत. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम बांगलादेशने सहा गडी गमावून 272 धावा केल्या आहेत. टीम इंडियाला विजयासाठी चार विकेट्सची गरज आहे. त्याचबरोबर बांगलादेशला हा सामना जिंकण्यासाठी 241 धावा करायच्या आहेत. बांगलादेशकडून झाकीर हसनने सर्वाधिक 100 धावा केल्या. टीम इंडियाकडून अक्षर पटेलने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या आहेत. तर कुलदीप यादव, उमेश यादव आणि आर अश्विन यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली आहे. (हे देखील वाचा: IND Wins Blind T20 World Cup 2022: अंधांसाठीचा टी-20 विश्वचषक 2022 भारताच्या खिशात, चषकावर तिसऱ्यांदा कोरले नाव; चहूबाजूंनी अभिनंदनाचा वर्षाव (Watch Video)

कर्णधार शाकिब आणि मेहदी हसन मिराज वेगवान धावा करत आहेत आणि भारतीय गोलंदाजांना वर्चस्व गाजवण्याची संधी देत ​​नाहीत. ही जोडी आता सामना संपवू पाहत आहे. मात्र, त्यांच्यापुढे बांगलादेशचे मोठे लक्ष्य आहे.