इरफान पठाण (Photo Credit: IrfanPathan/Instagram)

भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण (Irfan Pathan) याने आज, 4 जानेवारी रोजी सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. तब्बल 15 वर्षाच्या मोठ्या करिअर मध्ये इरफान याने 120 वन-डे, 29 कसोटी आणि 24 टी-20 सामन्यात टीम इंडियाचे प्रतिनिधीत्व केले आहे. पाकिस्तान (Pakistan) विरुद्ध कसोटी सामन्यात घेतलेल्या हॅट्रीकमुळे इरफान पठाण पहिल्यांदा चर्चेत आला तर 2007 साली दक्षिण आफ्रिकेत एम. एस. धोनी (M.S. Dhoni) च्या कॅप्टनशिप खाली भारताने जिंकलेल्या वर्ल्ड कप मध्ये इरफानला मन ऑफ द मॅच (Man Of The Match) किताब मिळाल्यानंतर त्याने क्रिकेट विश्वात आपली खरी छाप निर्माण केली होती.

आज इरफान पठाण याने एका कार्यक्रमात आपल्या निवृत्तीची घोषणा करताना आपल्या कारकीर्दीला उजाळा दिला. राहुल द्रविड, लक्ष्मण, सौरव गांगुली अशा दिग्गज खेळाडूंसोबत ड्रेसिंग रूम शेअर करण्याची संधी मिळाली हे आपले भाग्य आहे अशा या करिअरसाठी सर्वांची आभार असे म्हणताना इरफान भावुक झाला होता.

ANI ट्विट

दरम्यान, इरफान पठाण याची कारकीर्द पाहता काही खास सामने सर्वांच्या लक्षात राहणारे ठरले तर काही वेळा त्याच्या ग्राफ मध्ये बरीच पिछेहाट झाली होती मात्र तरीही पुनरागमन करून त्याने आपले कर्तृत्व सिद्ध केले होते. आजवर 29 कसोटी सामन्यात 100 बळी, 120 वन-डे सामन्यात 173 बळी आणि 24 टी-20 सामन्यात 28 बळी घेत त्याने आपली कारकीर्द गाजवली असे म्हणता येईल. इतकेच नव्हे तर फलंदाजी मध्ये सुद्धा इरफानचे वर्चस्व अनेकदा तगडे होते. 120 वनडे सामन्यात 1544 धावा टी-20 च्या 24 मॅचमध्ये 172 धावा असे त्याचे स्कोरपॉईंट्स आहेत.