आशिया कपमध्ये (Asia Cup 2023) राखीव खेळाडू म्हणून गेलेला यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनबद्दल (Sanju Samson) मोठी बातमी समोर येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केएल राहुलच्या (KL Rahul) आगमनानंतर संजू सॅमसनने संघ सोडला आहे. त्याला राखीव खेळाडू म्हणून ठेवण्यात आले आहे मात्र आता तो संघासोबत नसल्याचे बोलले जात आहे. आशिया चषक 2023 साठी भारतीय संघाची घोषणा झाली तेव्हा इशान किशन आणि केएल राहुल या दोन यष्टीरक्षकांची निवड करण्यात आली. याशिवाय संजू सॅमसनलाही बॅकअप म्हणून राखीव ठेवण्यात आले होते. मात्र, केएल राहुल आता सुपर-4 सामन्यासाठी भारतीय संघात सामील झाला आहे आणि त्यामुळेच संजू सॅमसनने संघ सोडल्याचे बोलले जात आहे.
Sanju Samson has released from Team India squad of Asia Cup 2023.#cricket #teamindia #sanjusamson #icc #bcci #AsiaCup23 #klrahul pic.twitter.com/XKPGjdCWab
— Cricket Addictor (@AddictorCricket) September 9, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)