टीम इंडियाने आजपासून आशिया चषकात आपल्या मोहिमेला सुरुवात केली आहे. पहिल्याच सामन्यात टीम इंडियाचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी (IND vs PAK) सामना होणार आहे. या हायव्होल्टेज मॅचकडे भारत आणि पाकिस्तानच्याच नव्हे तर जगभरातील क्रिकेटप्रेमींच्या नजरा लागल्या आहेत. दरम्यान, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या हायव्होल्टेज सामन्यासाठी दोन्ही संघ या दिग्गजांसह मैदानात उतरले आहेत.

दोन्ही संघाची प्लेइंग 11

टीम इंडिया : रोहित शर्मा शुभमन गिल, इशान किशन (यष्टीरक्षक), विराट कोहली, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

पाकिस्तान : फखर जमान, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)