इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या मोसमाचा (IPL Final 2023) अंतिम सामना आज चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स (Chennai Super King vs Gujarat Titans) यांच्यात खेळला जात आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Ahmedabad's Narendra Modi Stadium) दोन्ही संघांमधील हा सामना खेळला जात आहे. चालू मोसमातील फायनलच्या माध्यमातून चेन्नई 10 वा अंतिम सामना खेळणार आहे. तर, गुजरात टायटन्स त्यांच्या दुसऱ्या सत्रात सलग दुसऱ्या अंतिम फेरीसाठी मैदानात उतरणार आहे. गुजरात संघाने संपूर्ण हंगामात चमकदार कामगिरी केली आहे. दुसऱ्या क्वालिफायर मुंबईचा पराभव करत त्याने अंतिम फेरी गाठली. गुजरात टायटन्सला पहिल्या क्वालिफायरमध्ये चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. आता अंतिम सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): रिद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, साई सुदर्शन, हार्दिक पांड्या (कर्णधार), विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवाटिया, रशीद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी

चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार / विकेटकीपर), दीपक चहर, मथिशा पाथीराना, तुषार देशपांडे, महेश थिकशन

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)