India National Cricket Team vs England National Cricket Team: भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे, त्यातील दुसरा सामना (IND vs ENG 2nd ODI 2025) आज कटकमधील बाराबती स्टेडियमवर (Barabati Stadium, Cuttack) खेळवला जाईल. सामन्याल 1.30 वाजता सुरुवात होईल. टीम इंडियाने (Team India) पहिला एकदिवसीय सामना 4 विकेट्सने जिंकला होता आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. अशा परिस्थितीत हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. टीम इंडिया मालिका जिंकण्याच्या इराद्याने सामन्यात उतरेल तर इंग्लंडचा संघ मालिका बरोबरीत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. अशा परिस्थितीत हा सामना रंजक होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, इंग्लंडने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताकडून वरुण चक्रवर्तीचे वनडेमध्ये पदार्पण केले आहे.
पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती.
इंग्लंड: फिल साल्ट (यष्टीरक्षक), बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जेमी ओव्हरटन, गस अॅटकिन्सन, आदिल रशीद, मार्क वूड, साकिब महमूद.
🚨 Toss 🚨#TeamIndia have been put into bowl first 👍
Updates ▶️ https://t.co/NReW1eEQtF#INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/4tmuipNAO0
— BCCI (@BCCI) February 9, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)