
Rakhi Sawant Summoned By Maharashtra Cyber Cell: गेल्या काही दिवसांपासून 'इंडियाज गॉट टॅलेंट' (India's Got Latent) या शोमध्ये रणवीर अलाहाबादियाने (Ranveer Allahbadia) केलेल्या वादग्रस्त आणि अश्लील टिप्पणीमुळे शोमधील अनेक स्टार्सचीही चौकशी सुरू आहे. महाराष्ट्र सायबर सेलने अभिनेत्री राखी सावंतला (Rakhi Sawant) समन्स बजावले आहे. राखी सावंतला महाराष्ट्र सायबर सेल (Maharashtra Cyber Cell) ने 27 फेब्रुवारी रोजी तिचा जबाब नोंदवण्यासाठी बोलावले आहे. दरम्यान, महाराष्ट्र सायबर सेलने आशिष चंचलानी आणि रणवीर अलाहाबादिया यांना 24 फेब्रुवारी रोजी या प्रकरणात त्यांचे जबाब नोंदवण्यासाठी बोलावले आहे.
याशिवाय, विनोदी कलाकार समय रैनाने 17 मार्चपर्यंत वेळ मागितला होता. तथापि, महाराष्ट्र सायबरने समय रैनाला 17 मार्चपर्यंत वेळ देण्यास नकार दिला. तथापी, राखी सावंतने कॉमेडियन समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' या यूट्यूब शोच्या एका भागात जज म्हणूनही भाग घेतला होता. राखी सावंतसोबतचा एपिसोड खूपच व्हायरल झाला होता. या शोचे छोटे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले. (हेही वाचा - Advisory For Social Media And OTT Channels: केंद्र सरकारने सोशल मीडिया आणि ओटीटी चॅनेलसाठी जारी केली मार्गदर्शक तत्वे; अश्लील कंटेंटवर ठेवले जात आहे बारकाईने लक्ष)
रणवीर अलाहाबादियाने समयच्या शोमध्ये केलेल्या वादग्रस्त टिप्पणीनंतर निर्माण झालेल्या वादानंतर रैनाला ट्रोल करण्यात आले. त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर राखीने समयला पाठिंबा दिला दर्शवला होता. (हेही वाचा - India’s Got Latent Case: इंडियाज गॉट लेटेंट शोच्या सर्व सदस्यांविरुद्ध FIR दाखल)
तथापी, राखी सावंतने ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत अश्लील टिप्पणी वादाबद्दल म्हटले होते की, 'एका व्यक्तीने चूक केली, पण मग इतरांना का लक्ष्य केले जात आहे?' रणवीरने काहीतरी चुकीचे बोलले आणि ते चुकीचे होते हे मीही मान्य करते, पण फक्त समय रैनावरच टीका का होत आहे?