10th Student Shot Dead In Bihar (फोटो सौजन्य - PTI)

Student Shot Dead In Bihar: बिहारमधील रोहतास जिल्ह्यात मॅट्रिकच्या परीक्षेत कॉपी केल्याच्या आरोपावरून विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये झालेल्या संघर्षात दहावीच्या विद्यार्थ्याचा गोळीबारात मृत्यू (Student Shot Dead) झाला. तसेच दोन जण जखमी झाले. हा वाद शारीरिक हाणामारीने सुरू झाला. बिहार (Bihar) मधील सासाराम (Sasaram) येथील एका परीक्षा केंद्रावर उत्तरपत्रिका पाहिल्यानंतर कॉपी करण्यास परवानगी नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये हाणामारी आणि गोळीबार झाला. यादरम्यान, एका 16 वर्षीय विद्यार्थ्याचा गोळी लागून मृत्यू झाला. पोलिसांनी एका अल्पवयीन विद्यार्थ्यांला शस्त्रासह ताब्यात घेतले आहे.

स्थानिक पोलिसांनी विद्यार्थ्याचा मृतदेह ताब्यात घेतला असून तपास सुरू केला आहे. परिसरात परिस्थिती अजूनही तणावपूर्ण आहे. सासाराम येथे मोठ्या संख्येने पोलिस दल तैनात करण्यात आले आहेत. या घटनेत जखमी झालेल्या विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. बिहार पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, एका विद्यार्थ्याच्या पायाला आणि दुसऱ्याच्या पाठीला गोळी लागली. उपचारादरम्यान एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांसह ग्रामस्थांनी महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला, परंतु आम्ही त्यांना या प्रकरणात कारवाई करण्याचे आश्वासन दिले. (हेही वाचा - Dantewada: पोलिसांचे खबरी असल्याच्या संशयातून दंतेवाडामध्ये नक्षलवाद्यांकडून एका शिक्षकासह 2 जणांची गळा दाबून हत्या)

गावकऱ्यांकडून घटनेचा निषेध, पहा व्हिडिओ - 

गावकरी आणि मृत मुलाच्या कुटुंबाने निषेध करण्यास सुरुवात केली आणि न्याय मिळेपर्यंत स्थानिक महामार्ग रोखण्याची धमकी दिली. निषेधस्थळावरून घेतलेल्या व्हिडिओमध्ये रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला मोठ्या संख्येने लोक बसलेले दिसत आहेत.