Aditya Pancholi (फोटो सौजन्य - Wikimedia commons)

Aditya Pancholi Parking Row Case: बॉलिवूड अभिनेता आदित्य पांचोली (Aditya Pancholi) ने 20 वर्षांपूर्वी 2005 मध्ये पार्किंगवरून एका व्यक्तीला मारहाण केली होती. या भांडणात पीडित व्यक्तीचे नाक फ्रॅक्चर झाले होते. त्यानंतर न्यायालयात खटला दाखल करण्यात आला. या प्रकरणाच्या प्रदीर्घ सुनावणीनंतर 2016 मध्ये आदित्य पंचोलीला या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले. तथापि, आदित्य पंचोलीने याबाबत उच्च न्यायालयात अपील केले होते, त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी सुरूच राहिली. आता 20 वर्षांनंतर मुंबई न्यायालयाने या प्रकरणात आदित्य पांचोलीला दोषी ठरवले आहे. न्यायालयाने पूर्वीचा निकाल कायम ठेवला असून त्याला दोषी ठरवले आहे.

पार्किंग वादातून एका व्यक्तीला मारहाण केल्याप्रकरणी दोषी आढळलेल्या अभिनेता आदित्य पांचोलीची शिक्षा मुंबई सत्र न्यायालयाने कायम ठेवली. दंडाधिकारी न्यायालयाने त्याला सुनावलेली एक वर्षाची शिक्षा कमी करण्यात आली आणि त्याला चांगल्या वर्तणुकीच्या जातमुचलक्यावर सोडण्यात आले. तसेच पंचोलीला पीडित व्यक्तीला 1.5 लाख रुपये भरपाई देण्याचे निर्देश देण्यात आले. (हेही वाचा -Aditya Pancholi: अभिनेता आदित्य पांचोली विरोधात जुहू पोलीस ठाण्यात तक्रार)

न्यायालयासमोर सादर केलेल्या युक्तिवादांनुसार, 21 ऑगस्ट 2005 रोजी पंचोलीने अंधेरीमध्ये पार्किंगच्या जागेवरून प्रतीक पशीन नावाच्या व्यक्तीवर हल्ला केला होता. त्यानंतर वर्सोवा पोलिसांनी पंचोलीविरुद्ध तक्रार दाखल केली होती. 2016 मध्ये, अंधेरी मॅजिस्ट्रेट कोर्टाने पांचोलीला भारतीय दंड संहितेच्या कलम 325 (स्वेच्छेने गंभीर दुखापत करणे) अंतर्गत दोषी ठरवले. त्यानंतर पंचोलीला एक वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. (वाचा - अभिनेता-निर्माता आदित्य पंचोली वर बलात्काराचा आरोप; मुंबई पोलिसांकडून FIR दाखल)

दरम्यान, पांचोलीने दिंडोशी सत्र न्यायालयात या आदेशाविरुद्ध अपील दाखल केले. पीडित आणि त्याच्या पत्नीच्या जबाबात अनेक विसंगती आहेत आणि त्याला खोट्या प्रकरणात गोवण्यात आले आहे, असा अभिनेत्याने केला होता. तथापी, न्यायालयाने म्हटले की, 'ही घटना 20 वर्षांपूर्वी घडली होती हे लक्षात घेता... आरोपी हा 71 वर्षांचा आघाडीचा अभिनेता आहे. त्याचा कोणताही गुन्हेगारी इतिहास नाही आणि पार्किंगवरून झालेल्या वादात ही घटना अचानक घडली. त्यामुळे अभिनेत्याला सुनावण्यात आलेल्या शिक्षेच बदल करण्यात यावा.'