अभिनेता-निर्माता आदित्य पंचोली वर बलात्काराचा आरोप; मुंबई पोलिसांकडून FIR दाखल
Aditya Pancholi (Photo Credits: Twitter)

आदित्य पंचोली (Aditya Pancholi) आणि कंगना रनौत (Kangana Ranaut) हा वाद आता सर्वश्रुत आहे. या प्रकरणामुळे आदित्य पंचोलीची अब्रू अक्षरशः चव्हाट्यावर आली आहे. मात्र आदित्यमागील कायदेशीर समस्या सुटण्याचे नाव घेत नाहीत. आता पुन्हा एकदा बलात्कार (Rape) प्रकरणी हे नाव चर्चेत आले आहे. नुकतेच मुंबई पोलिसांनी आदित्य पंचोलीविरुद्ध FIR दाखल केली आहे. एका बलात्काराच्या घटनेबाबत ही FIR दाखल करण्यात आली आहे. हे नक्की कोणते प्रकरण आहे आणि कोणत्या महिलेच्या तक्रारीवरून ही FIR दाखल केली आहे, याबाबत अजूनतरी कोणतीही माहिती मिळाली नाही.

(हेही वाचा: महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या करण ओबेरॉय याला जामीन मंजूर)

आदित्यला अटक झाल्याचे कोणतेही वृत्त मिळाले नाही. दरम्यान याआधी अभिनेत्री कंगना रणौतने आदित्य पंचोलीवर शारीरिक हिंसा आणि मारहाणीचा आरोप केला होता. त्यानंतर आदित्याने याप्रकरणी कंगना व तिची बहिण रंगोलीवर मानहानीचा दावा ठोकला होता. नुकताच अंधेरी न्यायालयाने या मानहानी प्रकरणात कंगना आणि तिची बहीण रंगोली यांना चार समन्स जारी केले आहेत.