RCB W vs MI W, WPL 2025 7th Match: महिला प्रीमियर लीग 2025 स्पर्धेतील सातवा सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला आणि मुंबई इंडियन्स महिला यांच्यात बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. यावेळीही मुंबई इंडियन्सचे नेतृत्व हरमनप्रीत कौर करत आहे. तर, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची कमान स्मृती मानधनाच्या खांद्यावर आहे. दरम्यान, मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करत आरसीबी संघाने निर्धारित 20 षटकांत सात गडी गमावून 167 धावा केल्या. आरसीबीकडून स्टार अष्टपैलू एलिस पेरीने 81 धावांची शानदार खेळी केली. मुंबई इंडियन्सकडून अमनजोत कौरने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. अमनजोत कौर व्यतिरिक्त, शबनीम इस्माइल, नॅट सायव्हर-ब्रंट, हेली मॅथ्यूज आणि संस्कृती गुप्ता यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. हा सामना जिंकण्यासाठी मुंबई इंडियन्स संघाला 20 षटकांत 168 धावा कराव्या लागतील. मुंबई इंडियन्स संघ हा सामना जिंकून पॉइंट्स टेबलमध्ये वर जाऊ इच्छितो.
Ellyse Perry lifts RCB with a majestic knock, scoring nearly half of the team's total of 167-7 😮
Will MI take this one in Bengaluru?https://t.co/PxmNJRLEum | #RCBvMI | #WPL2025 pic.twitter.com/1D7KbGgGIa
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) February 21, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)