
Afghanistan National Cricket Team vs South Africa National Cricket Team, ICC Champions Trophy 2025 3rd Match Scorecard: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा तिसरा सामना आज म्हणजेच 21 फेब्रुवारी रोजी अफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ (SA vs AFG) यांच्यात कराचीतील नॅशनल स्टेडियममध्ये (National Stadium, Karachi) खेळला जात आहे. हा ग्रुप बी चा पहिला सामना आहे. दोन्ही संघांमधील हा सामना चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दोन्ही संघांचा हा पहिलाच सामना आहे. या स्पर्धेत अफगाणिस्तानचे नेतृत्व हशमतुल्लाह शाहिदी करत आहे. तर, दक्षिण आफ्रिकेची कमान टेम्बा बावुमा यांच्या खांद्यावर आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करुन अफगाणिस्तानसमोर 316 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
After opting to bat first, South Africa's batters kept the scoreboard ticking 🇿🇦
Afghanistan need 316 runs to win today 🎯 https://t.co/CjMfHVPtrp | #AFGvSA #ChampionsTrophy pic.twitter.com/zRe7l7qRCJ
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) February 21, 2025
दरम्यान, आजच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकल्यानंतर, दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी केली पण त्यांची सुरुवात निराशाजनक झाली आणि संघाला पहिला मोठा धक्का फक्त 28 धावांवर बसला. यानंतर, रायन रिकेल्टन आणि टेम्बा बावुमा यांनी मिळून डावाची सूत्रे हाती घेतली आणि संघाचा धावसंख्या 150 च्या पुढे नेली.
दक्षिण आफ्रिकेच्या संघाने निर्धारित 50 षटकांत सहा गडी गमावून 315 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून सलामीवीर रायन रिकल्टनने 103 धावांची शानदार खेळी केली. या उत्कृष्ट खेळीदरम्यान, रायन रिकेलटनने 106 चेंडूत सात चौकार आणि एक षटकार मारला. रायन रिकेल्टन व्यतिरिक्त कर्णधार टेम्बा बावुमाने 58 धावा केल्या. (हे देखील वाचा: Australia vs England ODI Stats: वनडे सामन्यामध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचा कसा आहे विक्रम, येथे पहा हेड टू हेड आकडेवारी; सर्वाधिक धावा आणि विकेट घेणारे खेळाडू)
दुसरीकडे, स्टार अष्टपैलू मोहम्मद नबीने अफगाणिस्तानला पहिले मोठे यश मिळवून दिले. अफगाणिस्तानकडून मोहम्मद नबीने सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. मोहम्मद नबी व्यतिरिक्त फजलहक फारुकी, अझमतुल्ला उमरझाई आणि नूर अहमद यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. हा सामना जिंकण्यासाठी अफगाणिस्तानला 50 षटकांत 316 धावा कराव्या लागतील. अफगाणिस्तानला हा सामना जिंकून स्पर्धेची सुरुवात विजयाने करायची आहे.