
Afghanistan National Cricket Team vs South Africa National Cricket Team: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा तिसरा सामना आज म्हणजेच 21 फेब्रुवारी रोजी अफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ (SA vs AFG) यांच्यात कराचीतील नॅशनल स्टेडियममध्ये (National Stadium, Karachi) खेळला गेला. हा ग्रुप बी चा पहिला सामना होता. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानचा 107 धावांनी पराभव केला. यासह, दक्षिण आफ्रिकेने या स्पर्धेची सुरुवात विजयाने केली आहे. दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करुन अफगाणिस्तानसमोर 316 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करताना संपूर्ण अफगाणिस्तान संघ 43.3 षटकांत फक्त 208 धावांवर ऑलआउट झाला.
After losing five ODIs in a row, it's an emphatic win at the start of the #ChampionsTrophy for South Africa ✅https://t.co/CjMfHVPtrp | #AFGvSA pic.twitter.com/2VjNjvF0tc
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) February 21, 2025
दरम्यान, आजच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण त्यांची सुरुवात निराशाजनक झाली आणि संघाला पहिला मोठा धक्का फक्त 28 धावांवर बसला. यानंतर, रायन रिकेल्टन आणि टेम्बा बावुमा यांनी मिळून डावाची सूत्रे हाती घेतली आणि संघाचा धावसंख्या 150 च्या पुढे नेली. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने निर्धारित 50 षटकांत सहा गडी गमावून 315 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून सलामीवीर रायन रिकल्टनने 103 धावांची शानदार खेळी केली. या उत्कृष्ट खेळीदरम्यान, रायन रिकेलटनने 106 चेंडूत सात चौकार आणि एक षटकार मारला. रायन रिकेल्टन व्यतिरिक्त कर्णधार टेम्बा बावुमाने 58 धावा केल्या.
दुसरीकडे, स्टार अष्टपैलू मोहम्मद नबीने अफगाणिस्तानला पहिले मोठे यश मिळवून दिले. अफगाणिस्तानकडून मोहम्मद नबीने सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. मोहम्मद नबी व्यतिरिक्त फजलहक फारुकी, अझमतुल्ला उमरझाई आणि नूर अहमद यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानची सुरुवातही निराशाजनक झाली कारण त्यांचे चार फलंदाज केवळ 50 धावा असतानाच पॅव्हेलियनमध्ये परतले. संपूर्ण अफगाणिस्तान संघ 43.3 षटकांत फक्त 208 धावांवर ऑलआउट झाला. अफगाणिस्तानकडून रहमत शाहने 90 धावांची सर्वोत्तम खेळी खेळली. या शानदार खेळीदरम्यान, रेहमत शाहने 92 चेंडूत नऊ चौकार आणि एक षटकार मारला. रेहमत शाह व्यतिरिक्त, अझमतुल्ला उमरझाई आणि रशीद खान यांनी 18-18 धावा केल्या.
त्याच वेळी, स्टार वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडीने दक्षिण आफ्रिकेच्या संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. दक्षिण आफ्रिकेकडून अनुभवी वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. कागिसो रबाडा व्यतिरिक्त, लुंगी एनगिडी आणि विआन मुल्डर यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.