India National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team: भारत (Indian National Cricket Team) आणि बांगलादेश (Bangladesh National Cricket Team) यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. हा कसोटी सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जात आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आज सामन्याचा दुसरा दिवस आहे. भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे आहे. तर बांगलादेश संघाचे नेतृत्व नजमुल हुसेन शांतोकडे आहे. पहिल्या दिवशी भारताकडून रविचंद्रन अश्विनने झटपट शतक झळकावले. दरम्यान, दुसऱ्या दिवशी भारताचा पहिला डाव 376 धावांवर आटोपला आहे. भारताकडून रविचंद्रन अश्विन 113, रवींद्र जडेजा 86 आणि यशस्वी जैस्वाल 56 यांनी सर्वाधिक धावा केल्या. तर बांगलादेशकडून हसन महमूदने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या आहे. बांगलादेशला डावाच्या पहिल्याच षटकात पहिला मोठा धक्का बसला. जसप्रीत बुमराहने ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर शादमान इस्लामला क्लीन बोल्ड केले. त्याला दोन धावा करता आल्या. फटकेबाजीनंतर बुमराहचा चेंडू आत आला. बांगलादेशचा स्कोर 2/1
1ST Test. WICKET! 0.6: Shadman Islam 2(6) b , Bangladesh 2/1 https://t.co/fvVPdgY1bR #INDvBAN @IDFCFIRSTBank #1stTEST
— BCCI (@BCCI) September 20, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)