
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये आयुष्य वेचणार्या वीर सावरकर यांच्या पुण्यतिथीचा (Veer Savarkar Punyatithi) आजचा दिवस आहे. विनायक दामोदर सावरकर यांनी 26 फेब्रुवारी 1966 दिवशी जगाचा निरोप घेतला. ते भारतीय स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी, समाजसुधारक, मराठी कवी व लेखक होते. 'हिंदुत्व' या संकल्पनेचे ते प्रणेते होते. लहानग्या सावरकरांनी आपली कुलदेवता भगवती हिच्यापुढे "देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन" अशी शपथ घेतली होती. स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथी निमित्त जाणून घ्या त्यांच्याबद्दल '10' खास गोष्टी.
सावरकरांनी वयाची 60 वर्षे स्वातंत्र्य व सुराज्य यांसाठी अथक परिश्रम घेतले. वयाच्या 83 व्या वर्षी त्यांनी 1 फेब्रुवारी 1966 पासून अन्न, पाणी आणि औषधाचा त्याग केला आणि अखेर 26 फेब्रुवारीला त्यांची प्राणज्योत मालवली.
वीर सावरकर यांना विनम्र आदरांजली





देशामध्ये हिंदू संघटन निर्माण करण्यासोबतच भाषाशुद्धीचा आग्रह धरून सावरकरांनी मराठी भाषेला 45 शब्द देखील दिले आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लंडन मध्ये कायद्याचे शिक्षण घेतले होते. मात्र त्यांनी आपलं आयुष्य देशसेवेसाठी वेचले. इंग्रजांना भारतातून हद्दपार करण्यासाठी त्यांनी काळ्यापाण्याची देखील शिक्षा भोगली. अंदमान मध्ये त्यांनी काळकोठडीचीही शिक्षा भोगली.