Examinations | (Representational Purpose | Photo Credits: Pixabay.com)

बीएमसी कडून Executive Assistant 2024 चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. 1846 जागांवर नोकरभरतीसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. 2-12 डिसेंबर 2024 दरम्यान विविध परीक्षा केंद्रावर यासाठी परीक्षा पार पडली आणि आता त्याचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. portal.mcgm.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर निकालाची पीडीएफ पाहता येणार आहे. बीएमसीच्या वेबसाईट वर निवड झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

बीएमसी मध्ये नोकरीसाठी पात्र झालेल्या या उमेदवारांना भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पालिकेच्या वेबसाईट वर भेट देऊन पुढील अपडेट्सची माहिती घ्यावी लागणार आहे.

BMC Executive Assistant 2024 चा निकाल कुठे पहाल?

BMC Executive Assistant 2024 चा निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. portal.bmc.gov.in. या अधिकृत संकेतस्थळावर “Career” section मध्ये “List of Selected Candidates for the Post of Clerk” वर क्लिक करावं लागेल. आता एक पीडीएफ दिसेल त्यामध्ये तुमचे नाव शोधावे लागणार आहे.

इथे पहा निकालाची पीडीएफ

बीएमसी च्या या परीक्षेसाठी पहिल्यांदा नोटिफिकेशन जारी करताना  पहिल्या प्रयत्नात दहावी आणि पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक असल्याची अट टाकण्यात आली होती. मात्र त्यावर आक्षेप घेऊन पुन्हा विचार करण्याचं आवाहन केल्यानंतर बीएमसीने ती अट काढून  1846 जागांसाठी पुन्हा जाहिरात प्रसिद्ध केली होती.