
लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित 'छावा' सिनेमामध्ये अभिनेता विक्की कौशल, रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना मुख्य भूमिकेमध्ये होते. सध्या या चित्रपटाचं सर्वत्र कौतुक होत आहे. 14 फेब्रुवारी दिवशी रीलीज झालेल्या या सिनेमामध्ये दिव्या दत्ता देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर बेतलेल्या या सिनेमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुसर्या पत्नीची अर्थात सोयराबाई यांची भूमिका दिव्या दत्ता ने साकारली आहे. सध्या सोयराबाई आणि हंबीरराव मोहिते यांचा एक सिनेमामध्ये नसलेला सीन वायरल होत आहे. सिनेमात हंबीररावांची भूमिका आशुतोष राणा यांनी साकारली आहे.
छावा सिनेमामधील डिलीट सीन वायरल
सोयराबाई यांनी आपल्या पुत्राला छत्रपती बनवण्याच्या ईर्ष्येमधून औरंगजेबाच्या मुलासोबत हातमिळवणी केल्याचं छत्रपती संभाजी महाराजांना समजतं. यानंतर सोयराबाईंचे भाऊ हंबीरराव मोहिते त्यांना या प्रकारारावरून सुनावतात. भावा- बहीणीचा हा सीन सिनेमामध्ये वगळण्यात आला आहे. पण ऑनलाईन वायरल झाल्याने त्यामधील दमदार संभाषणाचं कौतुक होत आहे.
Bollywood Bubble, ला दिव्याने मुलाखत देताना हा डिलीट झालेला सीन माझा आवडीचा सीन होता असं म्हटलं आहे. सिनेमात सीन नाही पण ऑनलाईन तो आल्याने मलाही आश्चर्य वाटत असल्याचं दिव्या म्हणाली आहे. सिनेमाला मिळत असलेला प्रतिसाद भारावणारा आहे.
View this post on Instagram
सिनेमातील सीन कापणं माझ्या हातात नाही. पण हा सीन सिनेमात असता तर अधिक आवडलं असतं. दरम्यान 'छावा' सिनेमाचं संगीत ए आर रेहमान यांचं आहे.