Chhaava Teaser | Instagram

‘Chhaava’ Advance Booking Opens Worldwide: मराठा साम्राज्याचे महान योद्धा छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित 'छवा' (Chhaava) चित्रपटाची सध्या जोरदार क्रेझ आहे. ऐतिहासिक गाथेवर आधारित हा चित्रपट 14 फेब्रुवारी 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात विकी कौशल (Vicky Kaushal,) आणि रश्मिका मंदान्ना मुख्य भूमीकेत आहेत. बहुप्रतिक्षित चित्रपट 'छावा'ची जगभरात अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू झाली आहे. चित्रपटात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांची भूमीका साकारत आहे. तर महाराणी येसूबाई (Yesubai) यांची भूमीका दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) साकारत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे. तर निर्मिती दिनेश विजन यांनी केली आहे.

चित्रपटातील दमदार स्टारकास्ट

या चित्रपटात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे, तर रश्मिका मंदान्ना त्यांची पत्नी येसूबाईच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय अक्षय खन्ना, आशुतोष राणा आणि दिव्या दत्ता हे देखील चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. (Chhaava Trailer and Release Date Out: विकी कौशल चा छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित 'छावा' 14 फेब्रुवारीला येणार रसिकांच्या भेटीला)

छावाचे आगाऊ बुकिंग सुरू

 

 
 
 

View this post on Instagram

 
 
 

 

A post shared by Maddock Films (@maddockfilms)

चित्रपटाबद्दल प्रचंड चर्चा

'छावा'चा ट्रेलर प्रदर्शित होताच प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल उत्साह वाढला. या चित्रपटात मोठ्या पडद्यावर भव्य सेट्स, शक्तिशाली संवाद आणि ऐतिहासिक लढाया पाहण्याचा थरार पाहायला मिळेल. विकी कौशलच्या अॅक्टींगचे आणि त्याच्या लूकचे खूप कौतुक होत आहे. आता चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाली आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर त्याची चांगली सुरुवात होण्याची अपेक्षा आहे.