Photo Credit- X

Govinda-Sunita Divorce: बॉलीवूड अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता आहुजा हे घटस्फोट घेत असल्याचे समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे त्यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. काही महिन्यांपूर्वी देखील अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता आहुजा यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरु होती. त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला आहे, अशी चर्चा सुरु होती. मात्र आता त्यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असल्याची एक इंस्टाग्राम पोस्ट व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये असं सांगण्यात आलं आहे की, आता लग्नाच्या 37 वर्षांनंतर बॉलीवूड अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता आहुजा यांचा घटस्फोट होणार आहे.

या संपूर्ण घटनेवर अद्याप दोघांकडूनही कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. गेल्या काही महिन्यांपासून बॉलीवूड अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता आहुजा यांच्या नात्यासंबंधी अनेक बातम्या व्हायरल होत आहेत. त्यामुळे आता त्यांचा खरच घटस्फोट होणार का, याची चर्चा सुरु आहे.

thenowindia ने त्यांच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये, अभिनेता गोविंदा आणि सुनिता आहुजा लग्नाच्या 37 वर्षांनंतर घटस्फोट घेत आहेत. गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा घटस्फोटाच्या अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात आले आहे. गोविंदाचे मराठी अभिनेत्रीसोबत अफेअर असून असल्याकारणाने आता घटस्फोटाचा निर्णय घेण्यात आला असावा, असे सांदण्यात अले आहे. कशाचीही पुष्टी झालेली नसली तरी सोशल मीडियावर आता सर्वत्र चर्चा सुरू आहे.नत्यांच्या अनेक दशकांपासून चाललेल्या वैवाहिक जीवनाचा हा खरोखरच शेवट असू शकतो का?

अभिनेता गोविंदा आणि सुनिता घेतायत घटस्फोट?

 

 
 
 

View this post on Instagram

 
 
 

 

A post shared by The Now India (@thenowindia)

काही दिवसांपूर्वी सुनीता आहुजाची एक मुलाखत व्हायरल झाली होती. ज्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की, ती आणि गोविंदा वेगळे राहतात. गोविंदाकडे तिच्यासाठी वेळ नाही. एवढच नव्हे तर पुढच्या आयुष्यात असा नवरा नको हे देखील त्यांनी म्हटले होते. तो सुट्टीवर जात नाही. आपला सगळा वेळ कामात घालवतो. एकत्र चित्रपट पाहायला गेलो नाही.

दरम्यान, सुनीताने दिलेल्या या मुलाखतीत त्यांच्या नात्यात बराच दुरावा आल्याचे दिसून आले होते. मात्र अद्याप दोघांनीही याबाबत अधिकृतपणे कोणतेही वक्तव्य दिलेलं नाही.