
DBS Job Cuts: जागतिक बँकिंग समूह डीबीएस (Global Banking Group DBS) 4 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची योजना आखत आहे. या कर्मचाऱ्यांना 3 वर्षांच्या कालावधीत काढून टाकले जाईल. ही कर्मचारी कपात डीबीएस ग्रुपच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी 10% आहे. कंपनीचे सीईओ पियुष गुप्ता यांनी सांगितले की, या कपातीमागील कारण म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा वेगाने वाढणारा वापर आहे. एआय ही भूतकाळात स्वीकारल्या गेलेल्या इतर कोणत्याही तंत्रज्ञानापेक्षा वेगळी आहे.
नॅसकॉमच्या एका कार्यक्रमात बोलताना गुप्ता यांनी सांगितले की, सिंगापूर बँकेच्या 15 वर्षांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच त्यांना नवीन नोकऱ्या निर्माण करण्यासाठी संघर्ष करावा लागत होता. या वर्षी, माझा सध्याचा अंदाज असा आहे की पुढील तीन वर्षांत, आम्ही आमचे कर्मचारी 4 हजार किंवा 10% कर्मचारी कमी करणार आहोत. (हेही वाचा - US Mass Layoffs: अमेरिकेत मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात; सरकार 9 हजारहून अधिक लोकांना कामावरून काढण्याच्या तयारीत)
एआय खूप शक्तिशाली आहे. ते अनुकरण देखील करू शकते. गेल्या दहा वर्षांत समूहात कोणतीही कपात झालेली नाही. 2016-17 मध्ये बँकेने एक डिजिटल परिवर्तन आणले ज्याचा परिणाम 1600 लोकांवर झाला, परंतु त्यापैकी जवळजवळ सर्वांना संघटना आणि इतर प्रतिनिधींशी सल्लामसलत करून पुन्हा नियुक्त करण्यात आले, असंही यावेळी गुप्ता यांनी नमूद केलं. (हेही वाचा - Meta Mass Layoffs: मेटाने घेतला मोठा निर्णय, पुढील आठवड्यात 3 हजार हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार)
डीबीएसने दोन वर्षांपूर्वी जनरेटिव्ह एआयची अंमलबजावणी सुरू केली होती. जनरेटिव्ह एआयचे पूर्ण फायदे अद्याप दिसून आलेले नाहीत, असंही गुप्ता यांनी यावेळी सांगितलं. डीबीएस समूह आता त्यांच्या व्यवसायात एआयचा वापर करत आहे, ज्यामध्ये ग्राहकांपर्यंत पोहोचणे, क्रेडिट अंडररायटिंग आणि भरती यांचा समावेश आहे.