आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी सामन्यात भारताने पाकिस्तानचा 6 विकेट्सने पराभव केला. या पराभवामुळे शेजारच्या देशातील लोक खूप नाराज आणि संतापलेले दिसले. दुसरीकडे, या सामन्यादरम्यान रोहित शर्माचा बळी गेल्यानंतर मालवणमध्ये एका भंगार दुकान मालकाने 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा दिल्याचा आरोप आहे. यानंतर आता मालवण नगरपरिषद प्रशासनाने सोमवारी या व्यक्तीचे भंगार दुकान पाडले. शिवसेनेचे निलेश राणे यांनी X वर दुकानावर बुलडोझर कारवाईचे फोटो शेअर केले. यावेळी ते म्हणतात, ‘मालवणात एक मुसलमान परप्रांतीय भंगार व्यवसायिक याने काल भारत पाकिस्तान मॅचनंतर भारत विरोधी घोषणा दिल्या. कारवाई म्हणून आम्ही या परप्रांतीय हरामखोराला जिल्ह्यातून हाकलून देणारच, पण त्या अगोदर तात्काळ त्याचा भंगार व्यवसाय उध्वस्त करून टाकला. मालवण नगर परिषद प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांनी ताबडतोब कारवाई केल्याबद्दल त्यांचे आभार.’

बुलडोझर कारवाईचा एक व्हिडिओ ऑनलाइन समोर आला आहे, ज्यामध्ये भंगार दुकान पाडताना दिसत आहे. वृत्तानुसार, रविवारी महाराष्ट्रातील सिंधुदुर्गातील मालवण येथे भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यादरम्यान दोन जणांनी भारतविरोधी घोषणा दिल्या. त्यानंतर स्थानिकांनी त्यांना पकडून ताबडतोब पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. सोमवारी स्थानिकांनी या घटनेच्या निषेधार्थ दुचाकी रॅली काढली. (हेही वाचा: Plot to Kidnap Foreigners: परदेशी नागरिकांच्या अपहरणाचा दहशतवादी कट! ICC Champions Trophy दरम्यान पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांनी दिला मोठा इशारा)

Bulldozer Action Against Scrap Shop: 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)