Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapsed: आज महाराष्ट्रातील सिंधुदुर्गातून एक मोठी बातमी समोर होती. येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फूट उंच पुतळा कोसळला. मालवण येथील राजकोट किल्ल्यावर दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. एवढा उंच पुतळा कोसळल्याने राज्यात खळबळ उडाली. महत्वाचे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. या घटनेनंतर राज्य सरकारवर निकृष्ट कामाचे आणि भ्रष्टाचाराचे आरोप होऊ लागले. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
सीएम शिंदे म्हणतात, ‘ही घडलेली घटना दुर्दैवी आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. हा पुतळा नौदलाने उभारला आहे. त्यांनी त्याची रचनाही केली होती. मात्र सुमारे 45 किमी/तास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे हा पुतळा कोसळला. उद्या, पीडब्ल्यूडी आणि नौदलाचे अधिकारी घटनास्थळी भेट देतील आणि त्यामागील कारणाचा तपास करतील. घटनेची माहिती मिळताच मी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना घटनास्थळी पाठवले. या घटनेमागील कारणे शोधून, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा त्याच ठिकाणी पुन्हा स्थापित करू.’ (हेही वाचा: Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapsed: ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचं कार्यालय फोडलं)
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोसळण्याच्या घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्पष्टीकरण-
Maharashtra CM Eknath Shinde says "The incident that happened is unfortunate. Chhatrapati Shivaji Maharaj is the revered deity of Maharashtra. This statue was erected by the Navy. They had also designed it. But due to strong winds of around 45 km/h, it fell and got damaged.… pic.twitter.com/CRSimZ08gk
— ANI (@ANI) August 26, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)