सिंधुदुर्गच्या मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा नव्याने पुतळा उभारण्यात आला आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण व पूजन पार पडले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मंत्री नारायण राणे, नितेश राणे, शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शिल्पकार आणि पद्मश्री राम सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल सुतार यांनी, छत्रपती शिवरायांच्या हात तलवार घेऊन उभ्या असलेल्या या पुतळ्याची उभारणी केली आहे. हा पुतळा जवळपास 91 फुटाचा असून, त्यात 10 फुटाचे पेडेस्ट्रॉल आहे. हा पुतळा महाराजांचा देशातील सर्वात उंच पुतळा असल्याचे फडणवीस म्हणाले. पुढील किमान 100 वर्ष हा पुतळा कुठल्याही प्रकारच्या वातावरणात टिकेल अशा प्रकारची याची रचना करण्यात आली आहे. पुतळा उभारण्यासाठी ब्राँझ धातूचा उपयोग करण्यात आला आहे. पुतळ्यासाठी सरासरी 6 ते 8 मिलिमीटर जाडीचे कांस्य वापरण्यात आले आहे. फियान, निसर्ग, तोक्ते यांसारख्या वादळांनाही या पुतळा तोंड देईल. यासह लवकरच आजुबाजूचा परिसर संपादित करून शिवसृष्टीच्या धर्तीवर काम करण्यात येणार असल्याचे फडणवीस म्हणाले. (हेही वाचा: Sant Dnyaneshwar Maharaj Gyanpeeth: भागवत धर्मातील विचार जगभरात पोहोचविण्यासाठी आळंदी येथे उभे राहणार 'संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानपीठ'; सरकारकडून तब्बल 701 कोटी रुपयांची तरतूद)
छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩#LIVE | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते किल्ले राजकोट, सिंधुदुर्ग येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन व दर्शन@Dev_Fadnavis#Maharashtra #DevendraFadnavis #ChhatrapatiShivajiMaharaj https://t.co/a7QBvRTpZQ
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 11, 2025
🕑 2.04pm | 11-5-2025📍Sindhudurg
LIVE | Media Interaction#Maharashtra #Sindhudurg https://t.co/P5fvI688WK
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 11, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)