आज 3 एप्रिल 2025 रोजी महाराष्ट्रात पावसाचा प्रभाव दिसून येणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पालघर, मुंबई, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, जळगाव, यांसारख्या भागांत विजांचा गडगडाट आणि वेगवान वाऱ्यासह पाऊस पडेल. पुण्यातही दुपारनंतर किंवा संध्याकाळी हलक्या ते मध्यम सरी कोसळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे उष्णतेतून थोडा आराम मिळेल. आता शास्त्रज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील 2-3 तासांत सिंधुदुर्ग, रत्नागिरीच्या दक्षिणेकडील काही भाग आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. आज राज्यातील अकोला, अमरावती आणि चंद्रपूर या ठिकाणी वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह गारपीट/गडगडाटी वादळाची शक्यता आहे. वातावरणातील उच्च तापमान आणि आर्द्रतेचा संगम, यामुळे हा बदल घडत आहे. यामुळे हवेत अस्थिरता निर्माण झाली आहे, आणि त्यातूनच ढगांचा गडगडाट आणि पावसाच्या सरींची शक्यता वाढली आहे. (हेही वाचा: Maharashtra Weather Forecast Tomorrow: राज्यात उद्या अनेक ठिकाणी गडगडाटासह मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा; हवामान खात्याने वर्तवला अंदाज, घ्या जाणून)

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)